Petrol Diesel Price : महागाईतून लवकरच दिलासा? मुंबईसह प्रमुख शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर जाणून घ्या...

Petrol Diesel Price Today : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. अशा परिस्थितीत आज भारतातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेल महाग झाले की स्वस्त जाणून घ्या... 

Updated: Mar 16, 2023, 07:50 AM IST
Petrol Diesel Price : महागाईतून लवकरच दिलासा? मुंबईसह प्रमुख शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर जाणून घ्या...   title=
Petrol Diesel Price on 16 March 2023

Petrol Diesel Price on 16 March 2023 : गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पाऊस सुरू आहे. त्यातच तुम्ही घाईगडबडीत घराच्या बाहेर पडणार असाल तर एकदा पेट्रोल-डिझेलचे (Petrol Diesel Rate) दर चेक करुन बाहेर पडा. कारण आंतरराष्ट्रीय बाजारातील उलथापालथीमुळे गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलचे (Petrol Diesel Price ) दर जाहीर केले आहेत. आज कंपन्यांनी तेलाच्या किमतीत कोणताही बदल केलेला नाही.

आज दिल्लीत (Delhi Petrol rate) एक लिटर पेट्रोल 96.72 रुपये प्रति लीटर तर डिझेल 89.62 रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे. तर आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत (mumbai petrol price) पेट्रोलचा दर 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रतिलिटर आहे. कोलकात्यात पेट्रोलचा दर 106.03 रुपये तर डिझेलचा दर 92.76 रुपये प्रति लिटर आहे. तर चेन्नईमध्येही पेट्रोल 102.63 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर आहे.

वाचा : मुंबईत आवकाळी पावसाची हजेरी, दुपारचं तापमान कमी होता होईना 

तर दुसरीकडे, राजस्थानच्या जयपूरबद्दल बोलायचे झाले तर तेथे पेट्रोल 75 पैशांनी आणि डिझेल 69 पैशांनी महागल्यानंतर 109.16 रुपये प्रति लीटर आणि 94.88 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. पाटण्यात आज पेट्रोल 107.74 रुपये आणि 94.51 रुपये प्रति लीटरने विकले जात असून पेट्रोल 27 पैशांनी आणि डिझेल 26 पैशांनी महागले आहे. 

शहर डिझेल (रु.) पेट्रोल (रु.)
दिल्ली 89.62 96.72
मुंबई 94.27 106.31
कोलकाता 92.76  106.03
चेन्नई 94.24 102.63 

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर 

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे (Petrol Diesel Price ) नवीन दर जाहीर केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत.

घरबसल्या चेक करा नवे  दर 

तुम्ही घरबसल्या पेट्रोल-डिझेलचे नवे दर चेक करू शकता. त्यासाठी तुम्हाला इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9224992249 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवा आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 टाइप करून माहिती मिळवू शकतात.  त्याचबरोबर HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.