पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींवर पियुष गोयल यांनी सांगितला पर्याय; 2023 पर्यंत सरकारचा मास्टर प्लॅन

सरकारने पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींवर एक नवा पर्याय काढला आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी सरकाचा प्लॅन सांगितला आहे. 

Updated: Jul 18, 2021, 02:26 PM IST
पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींवर पियुष गोयल यांनी सांगितला पर्याय; 2023 पर्यंत सरकारचा मास्टर प्लॅन title=

नवी दिल्ली : सरकारने पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींवर एक नवा पर्याय काढला आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी सरकाचा प्लॅन सांगितला आहे. त्यांनी म्हटले की, 2023-24 पर्यंत इथेनॉल ब्लेंडिंगचे लक्ष 20 टक्के ठेवण्यात आले आहे. सरकारचे लक्ष 100 टक्के वाहने इथेनॉलवर चालवण्याचे आहे. गोयल यांनी म्हटले आहे की, येत्या काही दिवसात बॅटरी टेक्नॉलॉजीची मागणी वाढणार आहे. अपारंपारीक क्षेत्रात जास्त विकासामुळे बॅटरी इंडस्ट्रीचा विकास होणार आहे.

अपारंपारीक क्षेत्रात आत्मनिर्भर भारत
पियुष गोयल यांनी म्हटले की, आमचे ध्येय अपारंपारीक ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्याचे आहे. आम्ही अशी टेक्नॉलॉजी डेवलप करू की ज्याच्या मदतीने पेट्रोलच्या ऐवजी 100 टक्के वाहने इथेनॉलवर चालतील. ज्यांच्याकडे इलेक्ट्रिक कार आहे, त्यांना आवाहन करतो की, आपली कार सौरऊर्जा किंवा अपारंपारीक ऊर्जेच्या माध्यमातून रिचार्ज करा. त्यासाठी भविष्यात मोठ्या स्तरावर चार्जिंग स्टेशनचे इफ्रास्ट्रक्चर तयार करण्यात येणार आहे.

सध्या इथेनॉलची ब्लेडिंग किती ?
आधी इथेनॉलचे ब्लेडिंग टार्गेट 2022 पर्यंत 10 टक्के आणि 2030 पर्यंत 20 टक्के ठेवण्यात आले होते. परंतु हे लक्ष आता वाढवण्यात आले आहे. आता देशातील पेट्रोलमध्ये साधारण 8.5 टक्के इथेनॉल मिळवले जाते. 2014 मध्ये हेच प्रमाण 1 ते 1.5 टक्के इतके होते.