भडका ! पेट्रोलनंतर आता डिझेलची शंभरीकडे वाटचाल, महागाईत होणार आणखी वाढ

Petrol Price Today 04 June 2021: पेट्रोल डिझेलच्या किंमतींनी आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडले आहेत.  आता पेट्रोलच्या किमतीनंतर डिझेलही शंभरीकडे वाटचाल करताना दिसत आहे.  

Updated: Jun 4, 2021, 09:17 AM IST
भडका ! पेट्रोलनंतर आता डिझेलची शंभरीकडे वाटचाल, महागाईत होणार आणखी वाढ title=

 मुंबई : Petrol Price Today 04 June 2021: पेट्रोल डिझेलच्या किंमतींनी आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडले आहेत. देशातील 135 जिल्ह्यांमध्ये पेट्रोलचे दर 100 रुपयांच्या पुढे गेले आहेत. केवळ या वर्षाबद्दल बोललो तर आतापर्यंत पेट्रोलच्या किंमतीत सुमारे 13 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आता पेट्रोलच्या किमतीनंतर डिझेलही शंभरीकडे वाटचाल करताना दिसत आहे. नव्या वर्षात डिझेल 12 रुपयांनी महाग झाले आहे. त्यामुळे महागाईत पेट्रोल-डिझेलचा अधिक भडका उडणार आहे.

सलग दोन दिवस कोणतीही दरवाढ न होता आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. पेट्रोल 26-27 पैसे प्रति लिटर महागले आहे, तर डिझेलच्या दरात 26-30 पैसे वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल प्रति बॅरल डॉलर 71 रुपयांच्या पातळीवर व्यापार करीत आहे, त्यामुळे किंमतींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

 आता डिझेल देखील 100 रुपयांपर्यंत

देशातील सर्वात महाग पेट्रोल राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये उपलब्ध आहे, तिथे पेट्रोलचा दर 105.80 रुपये आहे, तर डिझेल प्रति लिटर 98.63 रुपये आहे. जर किंमत अशाच प्रकारे वाढत राहिली तर येत्या काही दिवसांत डिझेल देखील येथे प्रति लिटर 100 रुपये होईल. मुंबईत पेट्रोलचा दर प्रति लिटर 101 रुपयांच्या जवळपास पोहोचला आहे, तर डिझेलची किंमत 93 रुपयांवर आहे.

मे महिन्यात पेट्रोल 4.09 रुपयांनी महागले

मे महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती 16 वेळा वाढविण्यात आल्या. पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत 4 मेपासून सलग 4 दिवस वाढ करण्यात आली होती, तर निवडणुका झाल्यामुळे पहिल्या 18 दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरात शांतता होती. दिल्लीतील पेट्रोलचे दर मे महिन्याच्या संपूर्ण महिन्यात 4.09 रुपयांनी महाग झाले आहेत. या महिन्यात डिझेल 4.68 रुपयांनी महाग झाले आहे.

मार्च, एप्रिलमध्ये पेट्रोल-डिझेल स्वस्त 

सर्वसामान्यांना 15 एप्रिल रोजी महागड्या पेट्रोल आणि डिझेलपासून थोडा दिलासा मिळाला. एप्रिलमध्ये आणि मार्च महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती तीनदा कमी करण्यात आल्या. 15 एप्रिल 2015 पूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये शेवटचा बदल होता. तर दिल्लीत पेट्रोल 22 पैसे तर डिझेल 23 पैसे स्वस्त होते. मार्चमध्ये पेट्रोल 61 पैशांनी तर डिझेल 60 पैशांनी स्वस्त झाले. मार्चमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तीन वेळा कपात करण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे जागतिक बाजारपेठेतील कच्च्या तेलात घसरण झाली होती.

मुंबईत पेट्रोल 101 रुपयांवर पोहोचले!

दिल्लीत पेट्रोल आज प्रति लिटर 94.76 रुपये विकले जात आहे. मुंबईसारख्या इतर शहरांमध्ये पेट्रोल 100.98 रुपये आहे, कोलकातामध्ये पेट्रोल 94.76 रुपये आहे. तर चेन्नईमध्ये पेट्रोल 96.23 रुपये विकले जात आहे.

4 मेट्रो शरातील Petrol ची किंमत 
शहर            कालचा दर     आजचा दर          
दिल्ली             94.49            94.76          
मुंबई             100.72           100.98
कोलकाता       94.50            94.76
चेन्नई              95.99            96.23

2021 मध्ये पेट्रोल 11 रुपयांनी महाग होते

सन 2021 मध्ये आतापर्यंत तेलाच्या किंमती 44 वेळा वाढविण्यात आल्या आहेत. या काळात पेट्रोल 11.05 रुपयांनी महाग झाले आहे. 1 जानेवारीला पेट्रोलची किंमत 83.71 रुपये होती, आज ते प्रति लिटर 94.76 रुपये आहे. त्याचप्रमाणे दिल्लीत 1 जानेवारीपासून आजपर्यंत डिझेल प्रतिलिटर 11.79 रुपयांनी महागला आहे. 1 जानेवारीला दिल्लीत डिझेलची किंमत प्रति लिटर 73.87 रुपये होती, आज ती 85.66 रुपये आहे.

पेट्रोल नंतर आता आज आपण डिझेलच्या किंमतींवर नजर टाकू. मुंबईत डिझेल 92.99 रुपये आहे. दिल्लीमध्ये डिझेल 85.66 रुपये प्रति लिटर विकले जात आहे. कोलकाता येथे डिझेल 88.51 रुपये आणि चेन्नईमध्ये डिझेल 90.38 रुपये दराने विकला जात आहे.

4 मेट्रो शहरातील Diesel ची किंमत
शहर          कालचा दर     आजचा दर
दिल्ली            85.38            85.66
मुंबई              92.69            92.99
कोलकाता      88.23            88.51
चेन्नई              90.12            90.38