राष्ट्रपती निवडणुकीसाठी अशी आहे मतांची आकडेवारी

राष्ट्रपती निवडणुकीसाठीचा कार्यक्रम निवडणूक आयोगानं जाहीर केला आहे. 

Updated: Jun 7, 2017, 06:54 PM IST
राष्ट्रपती निवडणुकीसाठी अशी आहे मतांची आकडेवारी  title=

रामराजे शिंदे, प्रतिनिधी, झी मीडिया, नवी दिल्ली : राष्ट्रपती निवडणुकीसाठीचा कार्यक्रम निवडणूक आयोगानं जाहीर केला आहे. १७ जुलैला राष्ट्रपतीपदासाठी मतदान होणार आहे तर २० जुलैला मतमोजणी होणार आहे.  विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाल जुलै महिन्यात संपत आहे.

५ राज्यातील निवडणुकींमुळे एनडीए चे राष्ट्रपती पदाचे गणित मजबूत झाले आहे. आता राष्ट्रपती पदावर दावा करण्यासाठी केवळ २० हजार मतांची आवश्यकता आहे. ज्या पक्षांनी अद्याप कोणाला पाठींबा द्यायचा हे निश्चित केले नाही अशा पक्षांच्या मतांची आकडेवारी १३ टक्के आहे. परंतू विरोधक एकत्र येऊन निवडणूक लढविली तर फायदा होऊ शकतो.

कोण असणार राष्ट्रपतीपदाचा उमेदवार ?

एनडीए : सध्या एनडीएने आपला उमेदवार जाहीर केला नाही. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी हे बाबरी मशिद प्रकरणी अडकले आहेत. तरीही ते निवडणूकीत सहभाग घेऊ शकतात.

युपीए : युपीएनं अद्याप राष्ट्रपतीपदासाठीच्या उमेदवाराचं नाव निश्चित केले नाही. विरोधकांच्या बैठका झाल्या परंतू या बैठकीला नितीश कुमार यांनी दांडी मारली. बीजेडी, वाएसआर काँग्रेस, तेलंगणा राष्ट्रीय समितीचे सदस्यही या बैठकीला अनुपस्थित होते.

काय आहे सध्याचे गणित?

एनडीए : लोकसभा , राज्यसभा, स्टेट असेंब्ली मिळून एकूण ५ लाख २७ हजार ३७१ मतं होत आहेत. एकूण मतदान टक्केवारी ४८.१० टक्के एनडीए कडे आहे.

युपीए : विरोधी पक्ष एकत्र झाले तर ५ लाख ६८ हजार १४८ म्हणजेच ५१.९० टक्के होत आहेत. ही टक्केवारी राष्ट्रपती पदासाठी पुरेसी आहे.

कोणावर असेल नजर?

एनडीए ची नजर एआयडीएमके, बीजेडी, टीआरएस पक्षावर असेल.

सध्या एआयडीएमके कडे ५.३६ %, बीजेडी कडे २.९८ %, टीआरएस कडे १.९९ टक्के आणि वायएसआरसीपी १.५३ टक्के मते आहेत. या पक्षांचा पाठींबा कोणाला असेल हे अजून निश्चित नाही. या सर्वांचे मतदान १३ टक्के आहे. अशा परिस्थितीत कोणत्या मोठ्या एका पक्षाचा किंवा दोन पक्षांचा पाठिंबा मिळाला तर एनडीए आपल्या निवडीचा राष्ट्रपती बनवू शकते.

मत मूल्य :

खासदार : एक खासदाराच्या मताचे मूल्य ७०८ आहे. एका खासदाराचे मताचे मूल्य सर्व आमदारांच्या मतमूल्य मध्ये सर्वच खासदारांच्या संख्येने भागून निश्चित केली जाते.

आमदार : ज्या राज्याचा आमदार आहे त्या राज्याची एकूण लोकसंख्येमधून एकूण आमदारांच्या संख्येला १००० ने भागून मतांचे मूल्य निश्चित केले जाते. युपी सारख्या मोठ्या राज्यात मधील आमदारांचे मुल्य २०८ आहे.

किती मतं आवश्यक?

कोणत्याही पक्षाला आपला राष्ट्रपती बनवण्यासाठी ५० टक्के म्हणजेच ५ लाख ४९ लाख ४४२ मतांची आवश्यकता आहे.

एकूण आमदार - ४,११४

आमदार मतमूल्य - ५ लाख ४९ हजार ४७४

एकूण खासदार - ७७६

खासदार मतमूल्य - ५ लाख ४८ हजार ४०८

एकूण मते- १० लाख ९८ हजार ८८२

मागील निवडणूकीचा निकाल

उमेदवार - २

एकूण मते : १० लाख २९ हजार ७५०

विजयी : प्रणव मुखर्जी

मागच्या निवडणुकीमध्ये प्रणव मुखर्जींना ७ लाख १३ हजार ७६३मते मिळाली होती.