सीपीएम कार्यालयाबाहेर सीताराम येचुरींना धक्काबुक्कीचा प्रयत्न

सीपीएम नेते सीताराम येचुरी यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 

Updated: Jun 7, 2017, 06:28 PM IST
सीपीएम कार्यालयाबाहेर सीताराम येचुरींना धक्काबुक्कीचा प्रयत्न title=

नवी दिल्ली : सीपीएम नेते सीताराम येचुरी यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दिल्लीतल्या भाई वीर सिंग मार्गावर असलेल्या सीपीएम कार्यालायामध्ये हा प्रकार घडला आहे.

हल्ल्याचा प्रयत्न सीताराम येचुरींच्या पत्रकार परिषदेआधी झाला. येचुरींना या हल्ल्यात कोणतीही इजा झाली नाही. सीपीएम कार्यालयात उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकांनी हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन युवकांना पकडलं. सीपीएम कार्यकर्त्यांनी या युवकांना मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिलं. या युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू आहे. येचुरींवर हल्ला करण्याआधी या युवकांनी भारत माता की जय च्या घोषणा दिल्याचं बोललं जात आहे.