मोठ्या शहरात राहणाऱ्या नागरिकांच्या जीवावर बेततेय 'ही' समस्या; आजंच सावध व्हा!

तुम्ही राहत असलेल्या मुंबईत अनेक वेळा आपण या वाहतूक कोंडीमुळे त्रस्त असतो. मात्र तुम्हाला माहितीये का, ही वाहतूक कोंडी आपल्या जीवावर बेतू शकते. हो, या वाहतूक कोंडीत आपल्या जीवाला धोका आहे. एका अहवालातून हे संकेत देण्यात आले आहे.

Updated: Jul 9, 2022, 01:24 PM IST
मोठ्या शहरात राहणाऱ्या नागरिकांच्या जीवावर बेततेय 'ही' समस्या; आजंच सावध व्हा! title=

Heart Attack Risk - मोठं शहर म्हटलं की, सुखसुविधा, उच्च जीवनशैली आणि चांगल्या नोकऱ्या या गोष्टी आल्याच. त्यामुळे तरुण-तरुणींचा कल शहरांकडे  वाढला आहे. शहरातील जेवढ्या सुखसुविधा आहेत त्यासोबत काही समस्याही असतात. गेल्या काही वर्षांत मोठ्या शहरात नागरिकांचा लोंढा वाढला आहे. त्यामुळे साहजिकच वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढतेय.

तुम्ही राहत असलेल्या मुंबईत अनेक वेळा आपण या वाहतूक कोंडीमुळे त्रस्त असतो. मात्र तुम्हाला माहितीये का, ही वाहतूक कोंडी आपल्या जीवावर बेतू शकते. हो, या वाहतूक कोंडीत आपल्या जीवाला धोका आहे. एका अहवालातून हे संकेत देण्यात आले आहे.

वाहतुककोंडीमुळे हृदयविकाराचा धोका

मुंबईत मोठ्या प्रमाणात वाहतुककोंडीची समस्या आहे. मुंबईत अनेक भागात वाहतुककोंडी आपण अनुभवत असतो. मुंबई - ठाणे, मुंबई-विरार या ठिकाणी जाताना लोकांचा जीव मेटाकुटीला येतो. वाहतुककोंडीमुळे होणाऱ्या आवाजामुळे आपल्या प्रकृतीचं नुकसान होतं.

एका अहवालानुसार वाहतुककोंडीत होणाऱ्या ध्वनीप्रदूषणामुळे आपल्याला हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता आहे. या अहवालानुसार, विमानातून निघणाऱ्या आवाजापासून आपलं नुकसान होतं नाही. मात्र रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतूक याच्यांपासून होणारे ध्वनीप्रदूषण आपल्या जीवावर बेतू शकतं.

कोणाचा आहे हा अहवाल?

हा अभ्यास जर्मनच्या 'ड्रेस्डन यूनिवर्सिटी ऑफ टेक्नोलॉजी' यांनी केला. तर याचा अहवाल डॉएच्च अर्जतेबलात इंटरनेशनल या मासिकात प्रकाशित करण्यात आला. या अभ्यासासाठी 40 वर्षांखालील जवळपास 10 लाखांहून अधिक आरोग्य विमा कंपन्यांकडून संशोधक अँड्रियास सिडलर आणि त्यांचे सह-लेखक यांनी माहिती मिळवली आहे.

या अभ्यासात 2005 मधील राइन-मेन परिसरात राहणाऱ्या लोकांच्या जवळपास रस्ते, रेल्वे आणि वाहतुकीचा आवाजाचा तपास करण्यात आला. त्यानंतर 2014-15 मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने किती लोकांनी आपले प्राण गमवले अशा लोकांची माहिती मिळवली. हा सगळ्या अभ्यास करताना त्यांना धक्कादायक माहिती हाती लागली. वाहतुककोंडीत होणाऱ्या वाहनांचा आवाज आणि हृदयविकाराचा झटका यांचा संबंध दिसून आला.

विमानाच्या आवाजाचा धोका?

तर, या अभ्यासात असं स्पष्ट झालं की, विमानातून होणाऱ्या ध्वनीतून आरोग्याचं नुकसान होतं नाही. कारण विमानातून निघणारा आवाज हा 65 डेसिबलपेक्षा जास्त नसतो. मात्र वाहतूक कोंडीत होणाऱ्या ध्वनीप्रदूषणातून आपल्या आरोग्याला धोका आहे. आपल्या हृदयाला सुरक्षित ठेवायचं असेल तर अशा आवाजापासून दूर राहा.