काँग्रेसचा 'हात' सोडत युवा नेता 2 जूनला होणार भाजपवासी

युवा नेता भाजपात प्रवेश करणार असल्याने काँग्रेसला मोठा झटका लागला आहे.

Updated: May 31, 2022, 09:19 PM IST
काँग्रेसचा 'हात' सोडत युवा नेता 2 जूनला होणार भाजपवासी title=
प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई : पाटीदार समजाचे युवा नेते हार्दिक पटेल अखेर 2 जूनला भाजपात प्रवेश करणार आहेत. पटेल काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची अनेक दिवसांपासून सुरू होती. मात्र, आता या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळांलं आहे. मात्र, या संदर्भात भाजपकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. (patidar leader hardik patel will join bhartiya janta party on 2 june 2022 big blow to congress before assembely election)

मिळालेल्या माहितीनुसार, हार्दिक पटेल गांधीनगरमधील  भाजप कार्यालयात पक्षाचे सदस्यत्व स्वीकारणार आहेत. भाजपच्या गुजरात युनिटचे अध्यक्ष चंद्रकात पाटील यांच्या उपस्थितीत हार्दिक पटेल पक्षात प्रवेश करणार आहेत. हार्दिकसह 15 हजार कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

दुसरीकडे, पाटीदार आंदोलनादरम्यान हार्दिकला त्याच्यावर सुरू असलेल्या खटल्याबाबत न्यायालयाने दिलासा दिला आहे. अशा स्थितीत हार्दिकचा निवडणूक लढवण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.

काँग्रेसचा 'हात' सोडला

पटेल यांनी 2019 साली काँग्रेसमध्ये प्वेश केला. त्यानंतर पक्षाकडून 11 जुलै 2020 मध्ये काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात  आली. मात्र पटेल काही संतुष्ट नव्हते. 

काँग्रेसला रामराम ठोकताना पक्षात निर्णय घेण्याचे अधिकार नसल्याचं पटेल यांनी म्हटलं होतं. तसेच काही गोष्टींबाबत पटेल यांनी आक्षेप जाहीर केला होता. त्यामुळे अखेर नाराजी व्यक्त करत पटेल यांनी काही दिवसांपूर्वी 18 मे ला काँग्रेसचा 'हात' सोडला. 

काँग्रेसला मोठा धक्का 

राजीनामा देण्यापूर्वी हार्दिक पटेलने आपल्या ट्विटर हँडलवरून पक्षाचे नाव आणि पोस्ट हटवली होती. गुजरातमध्ये याच वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत पटेल यांच्या जाण्याने काँग्रेसला मोठा धक्का बसू शकतो.