बंगळुरू : तिबेटीयन धर्मगुरू दलाई लामा यांनी देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याबाबत केलेल्या विधानाबद्दल माफी मागिलीतली आहे. जवाहरलाल नेहरू हे 'आत्मकेंद्री' होते, असे विधान दलाई लामा यांनी बुधवारी (५ ऑगस्ट) केले होते. त्यानंतर निर्माण झालेल्या वादानंतर लामा यांनी आपले विधान शुक्रवारी (७ ऑगस्ट) मागे घेतले आणि माफीही मागितली.
जवाहरलाल नेहरू हे ‘आत्मकेंद्री’ होते. पंतप्रधानपद स्वतःला मिळवण्यासाठी त्यांनी मोहम्मद अली जीना यांना पंतप्रधान करण्याच्या गांधीजींच्या इच्छेचा अनादर केला. तसेच, जवाहरलाल नेहरू यांच्याऐवजी मोहम्मद अली जिनांना भारताचं पंतप्रधान केलं असतं तर, भारताची फाळणी झाली नसती, असंही वक्तव्य दलाई लामा यांनी केलं होतं.
दरम्यान, आपले विधान मागे घेताना दलाई लामा म्हणाले, 'माझ्या विधानावरून वाद उभा राहिला आहे. मी चुकीचे काही बोललो असेन तर माफी मागतो. नेहरू हे ‘आत्मकेंद्री’ होते, म्हणजे तुम्हाला नेमके काय म्हणायचे होते, असे पत्रकारांनी दलाई लामा यांना विचारले. त्यावर उत्तर देताना त्यांनी गोव्यात बुधवारी केलेल्या विधानावर माफी मागितली.