'नेहरु गोमांस खायचे, ते पंडित असू शकत नाहीत'

गाय ही हिंदूंना पवित्र आहे तर डुक्कर हे मुस्लिमांसाठी निषिद्ध आहे.

Updated: Aug 11, 2018, 07:20 AM IST
'नेहरु गोमांस खायचे, ते पंडित असू शकत नाहीत' title=

लखनऊ: भाजपचे उत्तर प्रदेशातील आमदार ज्ञान देव अहुजा यांच्या पंडित नेहरु यांच्यासंदर्भातील एका विधानामुळे नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. नेहरु हिंदू व मुस्लिमांना निषिद्ध असलेल्या खाद्यपदार्थांचे सेवन करायचे. त्यामुळे त्यांना पंडित म्हणता येणार नाही, असे तर्कट अहुजा यांनी मांडले आहे. 

जवाहरलाल नेहरु  गायीचे आणि डुकराचे मांस खायचे. गाय ही हिंदूंना पवित्र आहे तर डुक्कर हे मुस्लिमांसाठी निषिद्ध आहे. त्यामुळे हे दोन्ही पदार्थ भक्षण करणाऱ्या व्यक्तीला पंडित म्हणता येणार नाही. केवळ ब्राह्मण मतदारांना खूश करण्यासाठी त्यांच्या नावापुढे पंडित अशी उपाधी लावण्यात आल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर सांगितले. 

अहुजा यांच्या या विधानावरुन काँग्रेस व भाजपमध्ये राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर उत्तर प्रदेशातील राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते विविध मुद्द्यांवर सातत्याने आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत.