आजपासून संसदेचं विशेष अधिवेशन; काय आहे यामागाचा हेतू? तुम्हाला हे माहित असायलाच हवं

Parliament special sessionSpecial Session : एकीकडे गणेशोत्सवाची धूम असतानाच दुसरीकडे देश पातळीवर संसदेच्या विशेष अधिवेशनाची चर्चा सुरु झाली आहे. या अधिवेशनातच नेमकं काय होणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे.   

सायली पाटील | Updated: Sep 18, 2023, 08:14 AM IST
आजपासून संसदेचं विशेष अधिवेशन; काय आहे यामागाचा हेतू? तुम्हाला हे माहित असायलाच हवं  title=
parliament special session agenda and latest updates

Parliment Special Session : देश पातळीवर घडणाऱ्या घडमोडींमध्ये आजचा दिवस (18 सप्टेंबर 2023) अतिशय महत्त्वाचा आहे. कारण, संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. सोमवारपासून सुरु होणारं हे अधिवेशन 22 सप्टेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी या अधिवेशनाची घोषणा केली त्या क्षणापासून हे अधिवेशन बहुतांश कारणांनी चर्चेचा विषय ठरलं आहे. शिवाय सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या खासदारांना व्हीप जारी करत विशेष अधिवेशनाला हजर राहण्याचे निर्देशही दिले आहे. 

थोडक्यात अधिवेशनापूर्वीचं एकंदर वातावरण पाहता अधिवेशनात काही महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता सध्या व्यक्त केली जातेय. एकिकडे या अधिवेशनाचा विरोध होत असतानाच दुसरीकडे अखेर केंद्र सरकारनं अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाचा अजेंडा जाहीर केला. यामध्ये संविधान सभेपासून मागील 75 वर्षांतील आठवणींना उजाळा दिला जाणार असल्याचं सांगण्यात आलं. या अधिवेशनात 4 महत्वाच्या विधेयकांसह महिला आरक्षण विधेयकावर चर्चा होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. 

विशेष अधिवेशनात कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार? 

  • जी 20 च्या यशस्वी आयोजनासाठी मोदींचं कौतूक
  • महिला आरक्षण विधेयक येण्याची शक्यता
  • रोहिणी आयोगाच्या शिफारशी स्विकारल्या जाऊ शकतात
  • चंद्रयान आणि सुर्ययान मोहिमेत भारताने मिळवलेल्या यशाबाबत मोदींचं अभिनंदन करणार
  • जम्मू कश्मीरमधील वाढते दहशतवादी हल्ले
  • विरोधक जात निहाय जनगणेची मागणी करणार
  • मराठा आरक्षणावर महाराष्ट्रातील खासदार आक्रमक भूमिका घेऊ शकतात
  • शेतकऱ्यांच्या एमएसपीचा मुद्दा, मणिपूर, भारत इंडिया वादावरून, भारत चीनच्या सीमावादावरून विरोधक आक्रमक

नव्या संसदेत कामजाची सुरुवात, पाहा खास वैशिष्ट्य 

गणेश चतुर्थीच्या निमित्ताने नवीन संसद भवनात कामकाजाला सुरुवात होणार असून, नवीन संसद भवनात कर्मचारी नवीन गणवेशात दिसणार आहेत. मार्शल, सुरक्षा रक्षक, अधिकारी, चेंबर अटेंडेंट यांना यानिमित्तानं नवीन गणवेश दिले जाणार असून ही मंडळी त्याच गणवेशात दिसतील. 

हेसुद्धा वाचा : Ganesh Chaturthi 2023 : गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्यांना 'हे' पर्यायी मार्ग वाहतुक कोंडीतून वाचवणार

 

नव्या संसदेत कर्मचाऱ्यांना बंद गळ्याच्या सूट ऐवजी गुलाबी रंगाच्या नेहरू जॅकेट आणि खाकी पँट परिधान करावी लागणार आहे. या जॅकेटवर कमळाची फुल असणार आहेत. तर, मार्शलच्या नवीन पोषाखात आता मणिपूरी पगडीचा समावेश करण्यात आला आहे. संसदेच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या निळ्या रंगाच्या सूटची जागा आता सेनेच्या पोषाखात असणार आहे.