मुंबई : संसदेच्या अर्थसंकल्पीय सत्राचा (Parliament Budget Session) दुसरा टप्पा सुरू झाला आहे. अर्थसंकल्प यापूर्वीच संसदेने मंजूर केला आहे. या अर्थसंकल्पावर या अधिवेशनात चर्चा होणे खूप महत्वाची आहे. परंतु अधिवेशनाची सुरुवात गोंधळाने सुरु झाली. पेट्रोल-डिझेल (Petrol Diesel Price) या इंधन दरवाढीवर चर्चेची मागणी संसदेत काँग्रेसने (Congress) केली. मात्र, काँग्रेसची मागणी मान्य न झाल्याने काँग्रेसने जोरदार हंगामा केला. त्यामुळे झालेल्या गोंधळानंतर संसदेच्या राज्य सभागृहाचे (Rajya Sabha) कामकाज तहकूब करण्यात आले आहे.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरे सत्र 8 एप्रिलपर्यंत चालेल. या अधिवेशानात विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षात जोरदार संघर्ष झाल्याचे दिसून येत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol Diesel Price) वाढत्या किंमतींबाबत काँग्रेसच्या खासदारांच्यावतीने स्थगन प्रस्ताव देण्यात आला आहे. तेलाच्या वाढत्या किंमतींबाबत काँग्रेसच्या खासदारांनी सभागृहात घोषणा दिल्या नंतर राज्यसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले. पहिल्यांदा कामकाज 11 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. पुन्हा केवळ 4 मिनिटांचे कामकाज झाले. त्यानंतर 1 वाजेपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आले.
या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर राज्यसभा अध्यक्ष व्यंकय्या नायडू म्हणाले, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून मी मल्लिकार्जुन यांचे स्वागत करतो. ते देशातील प्रदीर्घ कामकाज नेत्यांपैकी एक आहेत. मी सर्व सदस्यांना सभागृहात उपस्थित रहाण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, जेणेकरून येथे होणाऱ्या चर्चेमध्ये सभागी होतील आणि त्यांनी आपल्या ज्ञानात भर टाकावी वाढेल.' मात्र, विरोधक घोषणा देत राहिले.
24 years ago, we proposed a 33% reservation for women in Parliament. Today, 24 years later, we should raise this to 50% reservation for women in Parliament and assembly: Shiv Sena MP Priyanka Chaturvedi, in Rajya Sabha#InternationalWomensDay pic.twitter.com/IpLkTZTdU6
— ANI (@ANI) March 8, 2021
राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, पेट्रोल आणि डिझेलच्या दराबाबत चर्चा झाली पाहिजे. पेट्रोल जवळापस 100 रुपये तर डिझेल 80 आणि एलपीजीच्या किंमती सतत वाढत आहेत. तेलाच्या वाढत्या किंमतींमुळे संपूर्ण देश त्रस्त आहे. मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, यावर चर्चा व्हायला हवी यावर शेतकरी नाराज आहेत. याबाबत अध्यक्ष व्यंकय्या नायडू म्हणाले, हे नोंद करण्यात येणार नाही.