'या' तारखेआधी पॅन कार्ड Aadhaar शी लिंक करून घ्या, अन्यथा...

PAN-Aadhaar Card Link : आयकर विभागाने (Income Tax) अनेकदा नागरीकांना पॅन-आधार (PAN- Aadhaar) कार्डशी लिंक करण्याच्या सुचना केल्या होत्या. या लिंकनंतर अनेकांनी पॅन-आधार कार्डशी केले होते. तर काहींनी या सुचनेकडे दुर्लक्ष केले होते. 

Updated: Dec 11, 2022, 05:16 PM IST
 'या' तारखेआधी पॅन कार्ड Aadhaar शी लिंक करून घ्या, अन्यथा... title=

PAN-Aadhaar Card Link : आधार (Aadhaar) आणि पॅन कार्ड (PAN Card) धारकांसाठी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. जर तुमच्याकडे आधार आणि पॅन कार्ड ही दोन्ही कागदपत्रे असतील, तर ती लिंक करून घेणे खुप गरजेचे आहे. जर तुम्ही ती लिंक करून घेतली नसाल तर आताच करून घ्या. 

आयकर विभागाने (Income Tax) अनेकदा नागरीकांना पॅन-आधार (PAN- Aadhaar) कार्डशी लिंक करण्याच्या सुचना केल्या होत्या. या लिंकनंतर अनेकांनी पॅन-आधार कार्डशी केले होते. तर काहींनी या सुचनेकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे आता पुन्हा एकदा आयकर विभागाने नागरीकांसाठी सुचना केल्या आहेत. 

हे ही वाचा : PPF, EPF, GPF गुंतवणूकीत काय फरक आहे? जाणून घ्या 

'या' तारखेआधी लिंक करा

जर तुम्ही अद्याप तुमचे पॅन कार्ड आधारशी (PAN- Aadhaar) लिंक केले नसेल, तर तुम्ही 31 मार्च 2023 पूर्वी तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक करू शकता.आयकर विभागाने (Income Tax)  ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे.

आयकर विभागाचे ट्विट

आयकर विभागाने (Income Tax) ट्विटमध्ये म्हटलेय की, प्राप्तिकर कायदा 1961 नुसार, सर्व पॅन धारकांना, जे सूट श्रेणीत येत नाहीत, त्यांनी 31 मार्च 2023 पूर्वी त्यांचे पॅन आधारशी (PAN-Aadhaar Link) लिंक करणे अनिवार्य आहे.1 एप्रिल 2023 पासून, जे पॅन आधारशी लिंक नाहीत ते निष्क्रिय होतील. शेवटची तारीख जवळ आली आहे. उशीर करू नका, आजच लिंक करा, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.  

कायम खाते क्रमांक

पॅन हा भारतातील सर्व करदात्यांना दिलेला ओळख क्रमांक आहे. पॅन ही एक इलेक्ट्रॉनिक प्रणाली आहे ज्याद्वारे व्यक्ती/कंपनीसाठी सर्व कर संबंधित माहिती एकाच पॅन नंबरमध्ये रेकॉर्ड केली जाते.ती माहिती साठवण्यासाठी प्राथमिक की म्हणून काम करते आणि देशभरात सामायिक केली जाते.

आयकर विभागाने अनेकदा आधार कार्ड पॅन कार्डशी (PAN-Aadhaar Link)  लिंक करण्यास सांगितले होते.तरीही अनेकांनी आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक केले नव्हते. त्यामुळे आयकर विभागाने लोकांना आणखी एक संधी दिली आहे. आता 31 मार्च 2023 पूर्वी आधार कार्ड पॅन कार्डशी (PAN-Aadhaar Link) लिंक करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.