Who is Pam Kaur: भारताशी नाळ जुळलेल्या पण विदेशात दबदबा राखणाऱ्या अनेक व्यक्तींबद्दल तुम्हाला माहिती असेल. सुंदर पिचाई, सत्या नडेला, शांतनू नारायण, लीना नायर, संजय मेहरोत्रा, इंद्रा नूयी अशी अनेक नावे सांगता येतील ज्यांच्यावर प्रत्येक भारतीयाला गर्व आहे. हे दिग्गज जगातील बड्या कंपन्या संभाळत आहेत. भारतीय वंशाच्या या सीईओंच्या यादीत एक नवे नाव जोडले गेले आहे. हे नाव कदाचित तुम्ही कधी ऐकले नसेल पण त्यांनी कंपनीला 160 वर्षे जुना इतिहास बदलायला भाग पाडले.
हॉंगकॉंग अॅंण्ड शांघाय बॅंकिंग कॉर्पोरेशन म्हणजेच एसबीसीच्या प्रमुख फायनान्शियल ऑफिसर (CFO) पाम कौर सध्या खूप चर्चेत आहेत. भारतीय त्यांच्याबद्दल इंटरनेवर खूप माहिती शोधत आहेत. त्यांच्या शिक्षणापासून वय ते पगारापर्यंतच्या विविध गोष्टी गुगलवर सर्च केल्या जात आहेत.
पाम कौर यांची हॉंगकॉंग अॅंण्ड शांघाय बॅंकिंग कॉर्पोरेशन (HSBC) च्या प्रमुख फायनान्शियल ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय वंशाच्या पाम कौर यांचे काम पाहून एचएसबीसी बॅंकेने त्यांचा 160 वर्षांचा इतिहास बदलून एका महिलेला चीफ फायनान्शियल ऑफिसर म्हणून नियुक्त केले. बॅंकिंग आणि फायनान्शियल सर्व्हिसेसमधील प्रसिद्ध कंपनी एचएसबीसीमधील महत्वाची जबाबदारी पाम कौर यांना देण्यात आली. आता ही भारतीय वंशाची महिला 13643 लाख कोटी डॉलरच्या कंपनीचा आर्थिक डोलारा संभाळणार आहेत.
एसएसबीसीने 160 वर्षांच्या इतिहासात पाम कौर पहिल्यांदा चीफ फायनान्शियल ऑफिसर होत आहेत. वयाच्या 60 व्या वर्षी त्या बॅंकेतील मोठ्या पदाची जबाबदारी संभाळतील. याआधी मागची 12 वर्षे त्या कंपनीशी संबंधित होत्या. 1 जानेवारी 2025 पासून त्या पदभार स्वीकारतील. वर्ष 2013 मध्ये एचएसबीसी सोबत आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या पाम कौर यांना 11 वर्षामध्ये तीनवेळा प्रमोशन मिळाले.
पंजाबमध्ये राहणाऱ्या पाम कौर यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर पंजाब विश्वविद्यालयातून बीकॉम केले. यानंतर एमबीए डिग्री पूर्ण केली. मजबूत फायनान्शियल आणि अकाऊंटिगच्या अभ्यासावर त्यांनी आपली वेगळी ओळख बनवली. पाम कौर या इंग्लंड आणि वेल्समध्ये चार्टर्ड अकाऊंट संस्थेच्या फेलो सदस्य आहेत. त्यांनी अन्सट अॅण्ड यंग येथून चार्टर्ड अकाऊंटची पदवी मिळवली.
एचएसबीसीच्या सीएफओ म्हणून त्यांना 803,000 पाऊंड म्हणजेच साधारण 8.12 कोटी रुपये मिळतील. याशिवाय त्यांना 1,085,000 पाऊंड म्हणजेच साधारण 10.97 कोटी रुपये इतका पगार मिळेल. तसेच 80 हजार 300 पाऊंड म्हणजेच साधारण 81 लाख रुपये पेन्शन भत्तादेखील मिळेल. हे सर्व मिळून त्यांचे वार्षिक पॅकेज साधारण 21 कोटी रुपयांपर्यंत पोहोचते. पगाराच्या पॅकेजव्यतिरिक्त त्यांना बोनस 215 टक्क्यांपर्यंत वार्षिक इन्सेंटिव अॅवॉर्ड, लॉंग टर्म इनिशिएटिव्ह अॅवार्डदेखील मिळणार आहे.