Palmistry : तुमच्या लग्नरेषेवर 'ही' चिन्ह असतील तर तुमच्या साथीदाराला आहे मृत्यू योग...

हस्त शास्त्रानुसार एकापेक्षा जास्त विवाहरेषा असतील तर तुमच्या आयुष्यात एकापेक्षा जास्त प्रेमसंबंध किंवा पार्टनर्स येऊ शकतात असं बोललं जातं.

Updated: Oct 4, 2022, 07:17 PM IST
Palmistry : तुमच्या लग्नरेषेवर 'ही' चिन्ह असतील तर तुमच्या साथीदाराला आहे मृत्यू योग... title=

Palm reading guide: तुम्ही स्वतः किंवा तुमचं संपूर्ण कुटुंब तुमच्या लग्नासाठी प्रचंड प्रयत्न करत आहात. मात्र यश मिळत नाही? लग्न कधी होणार या विचारांनी त्रस्त आहात. तुमच्या आसपास असं कुणी आहे ज्याच्यासाठी अनेक जण शब्द टाकतायत, प्रयत्न करतायत? मात्र काही केल्या लग्न ठरतच नाही. अशात ही माहिती अत्यंत महत्त्वाची ठरू शकते. या बातमीतून आपण हस्तरेषा ( Hastarekha ) आणि आपल्या लग्न योगाबाबत जाणून घेणार आहोत. खरंतर लग्न म्हणजे एखाद्याच्या आयुष्याचा सर्वात महत्त्वाचा निर्णय. कारण लग्नानंतर संपूर्ण आयुष्य पूर्णपणे बदलून जातं. म्हणूनच शास्त्रात हस्तरेषेला ( meaning of various lines on palm) महत्त्वाचं स्थान आहे. आपल्या हातावरील लग्नारेषा आपल्या विवाहाबाबत सांगत असतात. यावरून तुमच्या वैवाहिक जीवनात काही समस्या येऊ शकतात का ? जाणून घेऊयात. ( Wedding lines)  

आपल्या हातावर अनेक रेषा असतात, अनेक उंचवटे असतात आणि यांना वेगवेगळी नावं देखील आहेत. यामधील जीवन रेखा, मनाची रेषा ( Brain Line ) , हृदय रेषा ( heart Line) , नशिबाची रेषा( Fortune line) , विवाह रेषा ( Wedding Line)  या आणि अशा अनेक रेषा असतात. अशात तुमची विवाह रेषा कोणती हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. आपल्या करंगळीखाली एक लहानशी रेषा असते याला विवाह रेषा किंवा लग्नरेषा म्हणतात. अनेकांच्या हातावर एकापेक्षा जास्त विवाह रेषाही असू शकतात. ही रेषा हाताबाहेरून करंगळीखालून हातावर  येताना पाहायला मिळते.    

एकापेक्षा जास्त लग्नरेषा असणं...

हस्त शास्त्रानुसार एकापेक्षा जास्त विवाहरेषा  ( multiple marriage lines )  असतील तर तुमच्या आयुष्यात एकापेक्षा जास्त प्रेमसंबंध किंवा पार्टनर्स ( Multiple love affairs or partners ) येऊ शकतात असं बोललं जातं. याचा अर्थ एकपेक्षा जास्त लग्न असा देखील लावला जातो. 

विवाहरेषेवर चौरस किंवा क्रॉस 

जर तुमच्या लग्नरेषेवर चौरस चिन्ह असेल किंवा क्रॉस ( squre or cross on palm) असेल तर याचे वेगवेगळे अर्थ निघतात. आधी जाणून घेऊया चौरस चिन्ह असल्यास त्याचा अर्थ काय होतो? तुमच्या लग्नरेषेवर चौरस असेल तर अशांचं नवरा किंवा बायकोसोबत चांगलं जमतं. अशांचं लग्नानंतर एकमेकांशी चांगलं जुळतं आणि वैवाहिक आयुष्य छान आनंदी जातं असं म्हणतात. मात्र तुमच्या विवाह रेषेजवळ क्रॉस असल्यास, हे अशुभ मानलं जातं. अशात तुमच्या पार्टनरच्या मृत्यू होण्याची शक्यता असते असं बोलतात. 

काळ्या रंगाचा गोल...

तुमच्या विवाह रेषेवर काळ्या रंगाचा गोल ( black spot or circle on palm ) असेल तर हेही अत्यंत अशुभ मानलं जातं. अशा दाम्पत्यांपैकी एकाला आपलं बरंचसं आयुष्य जोडीदाराशिवाय घालवावं लागतं. यामध्ये अपघाती मृत्यू ( Accidental death) किंवा आजारपणामुळे मृत्यू योग्य म्हणतात. अशांनी विवाहावेळी काळजी घ्यावी असं तज्ज्ञ सांगतात. 

डिस्केमर : वरील बातमीच्या माध्यमातून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रयत्न नाही. हस्तरेषा शास्त्राप्रमाणे सर्वसामान्य ज्ञानावर आहे. बातमीतील तथ्यांची zee 24 taas पुष्टी करत नाही. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.