पाकिस्तानच्या कुरापती सुरूच... भारतीय सेनेनं कच्छच्या वाळवंटात पाकिस्तानचं ड्रोन पाडलं

भारताच्या एअरस्ट्राईकनंतर पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत...

Updated: Feb 26, 2019, 11:37 AM IST
पाकिस्तानच्या कुरापती सुरूच... भारतीय सेनेनं कच्छच्या वाळवंटात पाकिस्तानचं ड्रोन पाडलं title=

अहमदाबाद : भारतानं पाकिस्तानविरुद्ध केलेल्या एअरस्ट्राईकनंतर पाकिस्तानचा आणखी एक मनसुबा भारतानं उधळून लावलाय. कच्छच्या वाळवंटात भारतीय सेनेनं पाकिस्तानचं ड्रोन पाडलंय. पाकिस्तानात एअरस्ट्राईक केल्यानंतर काही तासांत पाकिस्तानाचं एक ड्रोन गुजरातच्या कच्छ बॉर्डरकडे धाडलं होतं. सुरक्षा रक्षकांना या ड्रोनच्या हालचाली लक्षात येताच त्यांनी हे ड्रोन नष्ट केलं. 

उल्लेखनीय म्हणजे, मंगळवारी पहाटे भारतानं पाकिस्तानविरुद्ध केलेल्या एअरस्ट्राईकनंतरही पाकिस्तान भानावर आलेलं नाही. पाकिस्तानकडून अजूनही कुरापती सुरूच आहेत. पाकिस्तानातल्या दहशतवादी तळांवर भारताच्या वायुदलाने जोरदार हल्ला चढवल्याचं वृत्त आहे. जैश ए मोहम्मदच्या तळांवर भारताने पहाटे ३.३५ वाजता, पहाटे ३.३८ वाजता आणि पहाटे ३.५८ वाजता भारतीय वायुदलाने हा जोरदार हल्ला चढवलाय. एएनआय या वृत्त संस्थेनं दिलेल्या माहितीनुसार भारताच्या मिराज २००० या १२  विमानांनी पाकिस्तानातल्या दहशतवादी तळांवर जोरदार हल्ला चढवलाय़.  मात्र अजूनही भारताच्या संरक्षण विभागाने अधिकृत वृत्त दिलेलं नाही. भारतीय वायुदलाने बालाकोट परिसरात जैश ए मोहम्मदच्यातळांवर जोरदार हल्ले केलेत.  १००० किलोचे बॉम्ब दहशतवादी तळांवर फेकण्यात आल्याची माहिती आहे. मिराज २००० या प्रकाराच्या १२ विमानांनी हा जोरदार हल्ला चढवलाय. 

पाकिस्तानी एफ १६ चा पळपुटेपणा जगासमोर हल्ल्याला तोंड देण्याऐवजी पाकिस्तानची एफ १६ विमानं पळून गेली. मिराज विमानांची संख्या पाहूनच पाकिस्तानी विमानांनी शेपूट घातली. भारतीय हल्ल्याला तोंड देण्याऐवजी एफ १६ विमानांनी पळून जाणं पसंत केलं.