ड्रोनच्या माध्यमातून भारतात हत्यारं पाठवतोय पाकिस्तान

पाकिस्तानचं आणखी एक तंत्र समोर आलं आहे.

Updated: Sep 25, 2019, 05:56 PM IST
ड्रोनच्या माध्यमातून भारतात हत्यारं पाठवतोय पाकिस्तान title=

नवी दिल्ली : भारतात हत्यारं पाठवण्याचं पाकिस्तानचं आणखी एक तंत्र समोर आलं आहे. सीमेपलीकडून ड्रोनच्या साहाय्यानं मोठ्या प्रमाणात टाकलेला शस्त्रसाठा पंजाब पोलिसांनी हस्तगत केला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना या समस्येचं तातडीनं निराकरण करण्याची मागणी केली आहे. 

पंजाबच्या तान तरान जिल्ह्यामध्ये पोलिसांनी पाच एके रायफल, पिस्तुलं, सॅटेलाईट फोन आणि हातबॉ़म्ब जप्त केले आहेत. सप्टेंबर महिन्यात ४ दिवसांमध्ये ८ वेळा अशा पद्धतीनं हत्यारं पाठवण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. हा भारतात दहशतवाद पसरवण्याचा पाकिस्तानचा नवा मार्ग असून याचा तातडीनं बंदोबस्त करण्याची निकड सिंग यांनी व्यक्त केली आहे. पंजाबचे पोलीस महासंचालक दिनकर गुप्ता यांनी यामागे आयएसआय, जिहादी संघटना आणि खलिस्तानवादी असल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान, संरक्षणतज्ज्ञांनीही सुरक्षा वाढवण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.