नवी दिल्ली : भारतीय वायुसेनेचे ग्रुप कॅप्टन अभिनंदन वर्धमान (Abhinandan varthaman) यांना वीर चक्र (veer chakra) प्रदान केल्यानंतर पाकिस्तान (pakistan) सातत्याने भाषणबाजी करत आहे. पाकिस्तानच्या सर्व नेत्यांकडून संताप व्यक्त केल्यानंतर आता पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे वक्तव्यही समोर आले आहे. 2019 मध्ये, बालाकोट हवाई हल्ल्यानंतर, अभिनंदन यांनी त्यांच्या मिग-21 (MIg-21) बायसन लढाऊ विमानाने पाकिस्तानी F-16 लढाऊ विमान पाडले. (pakistan reaction on veer chakra to Abhinandan varthaman)
अभिनंदन यांनी त्यांच्या मिग-21 बायसन लढाऊ विमानाने पाकिस्तानी F-16 लढाऊ विमान पाडले. मात्र, यादरम्यान त्यांचे विमान पाकिस्तानच्या हद्दीत कोसळले, त्यानंतर त्यांना पाकिस्तानी लष्कराने कैद केले. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे म्हणणे आहे की, 'भारत केवळ आपल्या देशातील लोकांना खूश करण्यासाठी निराधार दावे करत आहे आणि अभिनंदन यांनी कोणतेही पाकिस्तानी विमान पाडलेले नाही.'
या वक्तव्यात पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने पुन्हा एकदा खोटेपणाची पुनरावृत्ती केली आहे. त्यांनी म्हटलं की, 'आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ आणि अमेरिकन अधिकाऱ्यांनी आधीच पुष्टी केली आहे की पाकिस्तानचे कोणतेही F-16 विमान पाडले गेले नाही, असे निवेदनात म्हटले आहे. पूर्णपणे उघड खोटे पसरवण्याचा भारताचा आग्रह हास्यास्पद आहे. भारत सरकारने शौर्याच्या काल्पनिक कृत्यांसाठी लष्करी सन्मान देणे हे लष्करी वर्तनाच्या प्रत्येक मानकांच्या विरुद्ध आहे. असा पुरस्कार देऊन भारताने स्वतःची खिल्ली उडवली आहे.'
Delhi: Wing Commander (now Group Captain) Abhinandan Varthaman being accorded the Vir Chakra by President Ram Nath Kovind, for shooting down a Pakistani F-16 fighter aircraft during aerial combat on February 27, 2019. pic.twitter.com/vvbpAYuaJX
— ANI (@ANI) November 22, 2021
या निवेदनात पुढे म्हटले आहे की, 27 फेब्रुवारी 2019 रोजी पाकिस्तानी हवाई दलाने दोन भारतीय विमाने पाडली होती, याची आठवण करून देण्याची गरज आहे. यापैकी एक मिग-21 विमान पीओकेमध्ये पडले होते. या विमानात बसलेल्या पायलटने स्वत:ला बाहेर काढले, नंतर पाकिस्तानी सैन्याने त्याला पकडले होते.'
"भारताची अथक आक्रमक कृती आणि शत्रुत्व असूनही, पाकिस्तानने या पायलटला सोडले होते, जे स्पष्टपणे दर्शवते की पाकिस्तान आपल्या शेजारी देशांसोबत शांतता प्रस्थापित करू इच्छित आहे," असे निवेदनात म्हटले आहे. याशिवाय नियंत्रण रेषेच्या पलीकडे पडलेले आणखी एक भारतीय विमान Su-30 देखील पाकिस्तानी लष्कराने पाडले. त्याच दिवशी, घाबरून, भारतीय लष्कराने श्रीनगरजवळ स्वतःचे एमआय 17 हेलिकॉप्टर पाडले, जे भारताने सुरुवातीला नाकारले पण नंतर ते स्वीकारले. त्या दिवशी भारतीय वायुसेनेचा पूर्ण पराभव झाला होता यात शंका नाही.'
मात्र, पाकिस्तानने कितीही खोटे दावे केले तरी ते अभिनंदन आणि भारतीय लष्कराचे शौर्य नाकारू शकत नाही. भारतीय लष्कराच्या सर्जिकल स्ट्राईकमुळे पाकिस्तान इतका घाबरला होता की त्याने 60 तासांच्या आत अभिनंदनची सुटका केली होती. पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री ख्वाजा मुहम्मद आसिफ यांनी स्वत: नॅशनल असेंब्लीत म्हटले होते की, पाकिस्तानने अभिनंदन यांना भारताच्या भीतीने सोडले आहे. अभिनंदनला सोडले नाही तर भारत त्याच्यावर हल्ला करू शकतो, अशी भीती पाकिस्तानला होती.