कोरोना संकट : लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढविले, पंतप्रधान मोदी यांची घोषणा

जगात कोरोनाचे संकट आहे. मात्र इतर देशांच्या तुलनेत भारत सुरक्षित आहे. लॉकडाऊनमुळे कोरोनामुळे नुकसान टळले आहे.  

Updated: Apr 14, 2020, 11:51 AM IST
कोरोना संकट : लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढविले, पंतप्रधान मोदी यांची घोषणा title=
संग्रहित छाया

नवी दिल्ली : जगात कोरोनाचे संकट आहे. मात्र इतर देशांच्या तुलनेत भारत सुरक्षित आहे. लॉकडाऊनमुळे कोरोनामुळे नुकसान टळले आहे. कोणाला जेवणाचा, कोणाला येण्या-जाण्याचा त्रास झाला, तुम्ही सगळयांनी हा त्रास सहन केला. तुम्ही शिस्तबद्ध सैनिकासारखे आपले कर्तव्य बजावत आहात. मी तुम्हाला सलाम करतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. त्याचवेळी कोरोनाचे संकट लक्षात घेता आणि सगळ्यांच्या मागणीचा विचार करुन ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आल्याची मोठी घोषणा मोदी यांनी यावेळी केली. कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी देशात दुसऱ्यांदा लॉकडाऊन करण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याआधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात २१ दिवसांचे लॉकडाऊन जाहीर केले होते. आज १४ एप्रिलला हे लॉकडाऊन संपणार होते. मात्र कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता मोदी यांनी लॉकडाऊनचा कालवधी वाढवण्याची घोषणा केली. लॉकडाऊन उठवले तर गंभीर परिणाम दिसून येतील, असे वक्तव्य जागतिक आरोग्य संघटनेने केल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी लॉकडाऊन वाढल्याची घोषणा केली आहे. 

२० एप्रिलपर्यंत काही नियम शिथिल करणार

कोरोनामुळे सुरु असलेला लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवण्यात आले आहे. कारण लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय राज्यांनी केलेल्या सूचनांनंतर करण्यात आल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे. कोरोनाविरोधातल्या लढाईत आता कठोरता वाढवण्यात येणार आहे. २० एप्रिलपर्यंत प्रत्येक गोष्ट बारकाईने केला जाईल. प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेतला जाईल. प्रत्येक क्षेत्राचे मुल्यांकन करण्यात येईल. जिथे कोरोनाचे रुग्ण कमी आढळतील, जिथे हॉटस्पॉट वाढणार नाही, अशा ठिकाणी २० एप्रिलनंतर काही काही सेवा सुरु केल्या जातील. सरकारकडून यासंदर्भात एक गाईडलाईन उद्या जारी करण्यात येईल, असे ते म्हणालेत.

भारताने योग्य वेळी योग्य निर्णय घेतले नसते तर काय झाले असते, याची कल्पना न केलेली बरी. अन्य देशांशी भारताची तुलना करणे योग्य नसले तरी देखील तुलनेने भारतातील कोरोनाबाधितांची संख्या ३० टक्क्यांनी कमी आहे. सोशल डिस्टंसिंग आणि लॉकडाऊनचा मोठा लाभ देशाला मिळाला आहे. लॉकडाऊन वाढवा ही नागरिकांकडून मागणी करण्यात आली आहे. लॉकडाऊमुळे आर्थिक नुकसान होतेच, मात्र ते जतेच्या जीवापेक्षा मोठे मानता येणार नाही, असे मोदी म्हणालेत. 

मोदींचे आवाहन, नोकरीतून कोणाला काढू नका!

कोरोनाचा धोका ज्येष्ठ नागरिकांना आहे. या ज्येष्ठ नागरिकांना कोरोनापासून वाचवावं लागेल.  लाॅकडाऊन लक्ष्मणरेषाचे पालन करा. घरात बनवलेल्या मास्कचा उपयोग करा. प्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी आयुष्य मंत्रालयाच्या नियमांचे पालन करा. गरम पाणी, काढा वापरा. आरोग्यसेतू मोबाईल ॲप डाऊनलोड करा. गरीब कुटुंबांची भोजनाची गरज पूर्ण करा.नोकरीतून कोणाला काढू नका. कोरोना योद्धांचा सन्मान करा. तुम्ही त्यांचे दोन वेळा सन्मान केला आहात. त्याचा मला अभिमान आहे, असे मोदी म्हणालेत.

समस्या दिसता क्षणी आपण त्यावर उपाय करणे सुरु केले. त्यामुळे अन्य देशांच्या तुलनेत कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. भारतीय नागरिकांनी दाखवलेला संयम प्रेरणादायी आहे. देशव्यापी लॉकडाऊनच्या काळात लोकांनी संयम पाळल्याचे दिसले. त्याचेवळी पंतप्रधान मोदी यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतिनिमित्त श्रद्धांजली वाहिली. मी डॉ. बाबासाहेब आंबोडकरांना नमन करतो, असे मोदी भाषणाच्या सुरुवातीला म्हणालेत. मोदी यांनी देशातील विविध राज्यांमधील सण आणि नववर्षानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या .