Optical Illusion: या फोटोत लपलेत दोन चेहरे, 20 सेकंदात शोधून दाखवा मुलगी आणि वृद्ध महिला

 तुम्ही फोटो पाहण्यास सुरुवात करताच, 20 सेकंदांचा टायमर सेट करा आणि दोन चेहरे शोधायला सुरू करा.

Updated: Jul 17, 2022, 04:45 PM IST
Optical Illusion: या फोटोत लपलेत दोन चेहरे, 20 सेकंदात शोधून दाखवा मुलगी आणि वृद्ध महिला title=

Genius Can Spot The Image: सोशल मीडियावर एकापेक्षा एक कठीण असे ऑप्टिकल इल्यूजन असलेले फोटो व्हायरल होत असतात. या फोटोतील संदर्भ उलगडताना नेटकऱ्यांचा कस लागतो. पण तरीही नेटकरी ऑप्टिकल इल्यूजनमधील फोटो शोधण्यासाठी आटोक्यात प्रयत्न करतात. यामुळे मेंदूला चालना मिळते, तसेच उत्तर मिळालं की आनंद होतो. आता असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.  

दोन चेहऱ्यांचा शोध

या फोटोत तुम्हाला दोन चेहरे शोधायचे आहेत. एकाच फोटोत एक तरुण मुलगी आणि वृद्ध महिलेचा चेहरा लपलेला आहे. पण हा फोटो तुम्हाला फक्त 20 सेकंदात शोधायचा आहे, हे आव्हान आहे. तुम्ही फोटो पाहण्यास सुरुवात करताच, 20 सेकंदांचा टायमर सेट करा आणि दोन चेहरे शोधायला सुरू करा.

काही लोक या फोटोमध्ये मुलगी लगेच पाहू शकतात. पण म्हातारी बाई शोधायला मेंदूवर ताण द्यावा लागू शकतो. फोटो नीट बघत राहिलात तर हे कोडे सोडवता येईल. या फोटोत दोन्ही लोक तुम्हाला दिसू शकतात. असे असले तरी काळजी करण्यासारखे काही नाही, खालील फोटो पाहून समजून घ्या, तुम्हाला फोटो कसा पाहावा लागेल...

फक्त काही लोकांना यश मिळाले

या फोटोकडे दोन वेगवेगळ्या दृष्टीकोनातून पाहिल्यास तुम्ही मुलगी आणि वृद्ध महिलेला एकत्र पाहू शकता. ऑप्टिकल इल्यूजन सोडवण्यासाठी अनेकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, परंतु त्यापैकी काही लोकांना यश मिळाले. जर तुम्हालाही यात दोन चेहरे दिसले असतील तर तुम्ही खरोखरच हुशार आहात.