नोटबंदीला १ वर्ष पूर्ण होत असतांना विरोधकांची सरकारला घेरण्यासाठी बैठक

8 नोव्हेंबरला नोटबंदीला 1 वर्ष पूर्ण होणार आहे. नोटबंदी आणि जीएसटीच्या मुद्दयावर विरोधक सरकारवर घेरण्याच्या तयारीत आहे. यासाठी सर्व विरोधी पक्ष एकत्र येणार आहेत.

Updated: Oct 23, 2017, 05:09 PM IST
नोटबंदीला १ वर्ष पूर्ण होत असतांना विरोधकांची सरकारला घेरण्यासाठी बैठक title=

नवी दिल्ली : 8 नोव्हेंबरला नोटबंदीला 1 वर्ष पूर्ण होणार आहे. नोटबंदी आणि जीएसटीच्या मुद्दयावर विरोधक सरकारवर घेरण्याच्या तयारीत आहे. यासाठी सर्व विरोधी पक्ष एकत्र येणार आहेत.

सरकारविरोधात रणनिती आखण्यासाठी काँग्रेसने एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. बैठकीत नोटबंदीला 1 वर्ष पूर्ण होणार असल्याने त्यासंबधित समस्यांवर सरकारला घेरण्यासाठी काँग्रेस योजना आखणार आहे.

या बैठकीत सर्व विरोधी पक्षांना बोलवण्याऐवजी फक्त ठराविक पक्षांना बोलावण्यात येणार आहे. विरोधी पक्षांना एकत्रित ठेवण्यासाठी 6 पक्षाच्या प्रतिनिधींचा एक समुह बनवण्यात आला आहे. जो यावर रणनिती आखणार आहे. 

काँग्रेसशिवाय या समुहात ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेस, शरद पवारांचा राष्ट्रवादी, जदयु, लेफ्ट आणि द्रमुकच्या प्रतिनिधींचा समावेश आहे.