ताजमहालमधील मशिदीत नमाज पढण्यास परप्रांतीयांना बंदी

ताजमहालच्या सुरक्षिततेसाठी यावर्षी २४ जानेवारी रोजी जिल्हा प्रशासनाने आदेश काढला होता.

Updated: Jul 9, 2018, 05:45 PM IST
ताजमहालमधील मशिदीत नमाज पढण्यास परप्रांतीयांना बंदी title=

सर्वोच्च न्यायालयाने ताजमहल परिसरातील एका मशिदीत नमाज पठण करण्यास बंदी घातली आहे. न्यायमूर्ती सिक्री आणि न्या. अशोक भूषण यांच्या खंडपीठाने हा निर्णय जाहीर केला. ताजमहल हे जगातील सात आशर्चयापैकी एक आहे. त्यामुळे याठिकाणी नमाज पठण करू नये असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले. ताजमहाल जगातील सात आश्चर्यांपैकी एक असून त्याचे जतन झालेच पाहिजे असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. ताजमहालच्या सुरक्षिततेसाठी यावर्षी २४ जानेवारी रोजी जिल्हा प्रशासनाने आदेश काढला होता. फक्त स्थानिकांनाच ज्यांच्याकडे वैध पुरावा आहे त्यांनाच ताजमहालमधल्या मशिदीत नमाज पढण्याची परवानगी मिळेल असे आदेशात म्हटले होते.

या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. शुक्रवारच्या नमाज पठणासाठी ताजमहालच्या परिसरात येणाऱ्या नागरिकांनी ते आग्रा शहरातील निवासी हे सिद्ध करण्यासाठी सोबत ओळखपत्र आणावे असे जिल्हा प्रशासनाने आदेशात म्हटले होते. ताजमहाल शुक्रवारी पर्यटकांसाठी बंद असते. ताजमहालमधल्या परिसरात काही बांगलादेशी आणि परदेशी नागरिक नमाज पठणाच्या बहाण्याने प्रवेश करत असल्याच्या तक्रारी मिळाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने परप्रांतीयांवर बंदी घालणारा आदेश काढला होता.