मुंबई : आपल्यापैकी असे अनेक लोक आहेत, जे ऑनलाईन गेम्स खेळत असतात. ऑनलाईन गेम हे असे गेम असतात. जेथे तुम्ही न ओळखीच्या लोकांसोबत गेम खळता, अशाच ऑनलाईन गेमपैकी एक आहे ते म्हणते लूडो. तसे पाहाता हा खेळ आधी हाताने खेळला जायचा, म्हणजेच हा फोनवरील गेम नव्हता. परंतु नंतर त्यो फोनमधील गेममध्ये येऊ लागला. ज्यामुळे अनेक लोक ते खेळू लागले. परंतु या खेळामुळे इतकी मोठी गोष्ट घडेल असा कोणी विचार देखील केला नसावा.
खरं तर ऑनलाइन लुडो गेम खेळत असताना बिहारच्या छपरा येथे राहणारा मुलगा आणि युपीच्या आग्रा येथे राहणारी मुलगी प्रेमात पडले. कालांतराने दोघांमध्ये फोनवर बोलणे सुरू झाले आणि जवळीक वाढत गेली.
त्यानंतर या मुलाच्या प्रेमात वेडी झालेली ही मुलगी, त्याला भेटण्यासाठी घरातून कोणालाही न सांगता निघून गेली. इथ पर्यंत सगळी कहाणी सुंदर सुरु होती. परंतु त्यानंतर या प्रेम कहाणीने असा काही युटर्न घेतला की, प्रियकर थेट तुरुंगात पोहोचला.
आता त्यांच्यामध्ये नक्की असं काय घडलं, असा प्रश्न सर्वांनाच पडला असावा. तर यासाठी आपल्याला त्यांची संपूर्ण कहाणी जाणून घ्यावी लागेल.
तीन दिवसांपूर्वी आपल्या प्रियकला भेटण्यासाठी ही प्रयसी आपल्या घराच्यांना न सांगता निघून गेली. त्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल केला. यानंतर यूपी पोलिसांनी दोघांनाही मारहौराच्या यासगळयाची तपासणी केली असता. त्यांना अपहरण झाल्याचा संशय आला. ज्यामुळे त्यांनी मुलीचा शोध घेणं सुरु केलं.
खरंतर हे दोघेही प्रेमी जोडपं तीन दिवसांपासून मरहौरा येथील आघारा गावातील मरहौरा शहरात आले. जिथे त्यांनी घरमालकाशी बोलून आधार कार्डच्या मदतीने भाड्याने घर घेतले आणि राहू लागले.
दरम्यान, या प्रकरणाची नोंद झाल्यानंतर यूपी पोलीस सक्रिय झाले आणि मोबाईलच्या आधारे तरुणाची ओळख पटवून त्याला अटक केली आणि भाड्याच्या खोलीतून मुलीलाही ताब्यात घेतले. ही घटना समोर आल्यापासून संपूर्ण परिसरात लुडो ऑनलाइन गेमची चर्चा जोरात सुरू आहे.