नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील बांदीपुरामध्ये सुरक्षारक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षारक्षकांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला आहे. तर दोन दहशतवाद्यांना घेराव घालण्यात आला आहे. अद्यापही चकमक सुरु असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, रविवारी सकाळपर्यंत बांदीपुरामध्ये सुरक्षारक्षकांनी दहशतवादी लपले असल्याच्या माहिती मिळाल्यानंतर शोधमोहिम सुरु केली होती.
या सर्च ऑपरेशनदरम्यान सुरक्षारक्षकांना पाहताच दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला. सुरक्षारक्षकांनी दहशतवाद्यांच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत, भारतीय सेनेकडूनही गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश आलं.
#UPDATE Chinar Corps-Indian Army: One terrorist neutralised in the ongoing operation in Bandipora. Operation in progress. #JammuandKashmir https://t.co/ttFrkbf2ks
— ANI (@ANI) November 10, 2019
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा रक्षकांनी दहशतवादी लपले असल्याचा संशय असलेल्या भागात घेराबंदी केली होती. दहशतवाद्यांच्या शोधासाठी सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आले होते. दहशतवाद्यांनी सुरक्षा रक्षकांवर गोळीबार केल्यानंतर ही चकमक सुरु झाल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय सैन्याकडून दहशतवाद्यांच्या शोधात कारवाई केली जात आहे.