१ रुपयांच्या नोटेचा १०० वर्षांचा प्रवास पूर्ण, जाणून घ्या इतिहास

आपल्या लाडक्या १ रुपयाच्या नोटेबद्दल काही खास...

Sunil Desale Sunil Desale | Updated: Nov 30, 2017, 10:09 AM IST
१ रुपयांच्या नोटेचा १०० वर्षांचा प्रवास पूर्ण, जाणून घ्या इतिहास title=

मुंबई : १ रुपया... आपल्या सर्वांच्याच रोजच्या आयुष्यात एक रुपयाचा वापर होतो. लग्न-कार्यातही या एक रुपयाला खूप किंमत असते. हीच एक रुपयांची नोट आज १०० वर्षांची झालीय. या नोटेची सुरुवात आणि १०० वर्षांचा इतिहासही काही खास आहे. पाहूयात याच आपल्या लाडक्या १ रुपयाच्या नोटेबद्दल काही खास...

पूर्वीच्या काळी आणे हा प्रकार होता. एका रुपयात १६ आणे असत. नंतर एका रुपयात १०० नव्या पैशांची मोजणी सुरु झाली.

एक रुपयाची पहिली नोट चलनात

पहिलं विश्वयुद्ध आणि देशाची सत्ता इंग्रजांच्या हातात होती. त्याकाळात १ रुपयांचा चांदीचा शिक्का चलनात होता. मात्र, युद्धकाळात १ रुपयांचा शिक्का बनवण्यात अडथळा निर्माण झाला आणि त्यानंतर १९१७मध्ये पहिल्यांदा १ रुपयांची नोट समोर आली.

३० नोव्हेंबर १९१७ रोजी नोट चलनात

ठिक १०० वर्षांपूर्वी म्हणजेच ३० नोव्हेंबर १९१७ रोजी सरकारने एक रुपयाची पहिली नोट चलनात आणली. त्यावेळी ब्रिटनचा राजा जॉर्ज पंचम यांचा फोटो नोटवर छापण्यात आला होता. 

One Rupee Note

पहिल्यांदा छपाई बंद

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटनुसार, या नोटेची छपाई पहिल्यांदा १९२६मध्ये बंद करण्यात आली. त्यामागचं कारणं म्हणजे छपाईसाठी होणारा खर्च अधिक होता. त्यानंतर १९० रोजी पुन्हा छपाई सुरु केली आणि १९९४ पर्यंत सुरु राहीली. त्यानंतर या नोटची छपाई पुन्हा २०१५ रोजी सुरु केली.

भारत सरकारकडून छपाई 

एक रुपयांच्या नोटेची खास बाब म्हणजे इतर नोटांप्रमाणे भारतीय रिझर्व्ह बँक प्रसिद्ध करत नाही तर स्वत: भारत सरकार या नोटांची छपाई करतं. या नोटवर रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांची स्वाक्षरी नसते तर देशाचे वित्त सचिवांची सही असते. इतकचं नाही तर ही एक 'मुद्रा' नोट (करंसी नोट) आहे तर इतर नोटा या (प्रॉमिसरी नोट) असतात.

नामकरण

रुपया शब्दाचं मुळ संस्कृतमधील रुप् किंवा रुप्याह् येथून आहे. याचा अर्थ कच्ची चांदी असा होतो आणि रुप्यकम्चा अर्थ चांदीचा शिक्का असा होतो. "रुपया" शब्दाचा प्रयोग सर्वातआधी शेरशाह सुरी यांनी आपल्या शासन (१५४०-१५४५) दरम्यान केला होता.

शेरशाह सुरीने आपल्या शासन काळात चांदीच्या शिक्यांचा वापर सुरु केला. त्याचं वजन १७८ ग्रेन (११.५३४ ग्रॅम) होतं. पूर्वी रुपया (११.६६ ग्रॅम)ला १६ आणे म्हणजेच ६४ पैसे किंवा १९२ पाईत विभागलं जात होतं. त्यानंतर १९५७ मध्ये एक रुपया १०० पैशांत विभाजित झाला.