सावधान... LIC पॉलिसीला आधार लिंक करण्याचा SMS तुम्हालाही आलाय का?

सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनी भारतीय जीवन विमा निगमनं (एलआयसी) आपल्या पॉलिसीधारकांना सावधानतेचा इशारा दिलाय. 

Updated: Nov 30, 2017, 09:19 AM IST
सावधान... LIC पॉलिसीला आधार लिंक करण्याचा SMS तुम्हालाही आलाय का? title=

मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनी भारतीय जीवन विमा निगमनं (एलआयसी) आपल्या पॉलिसीधारकांना सावधानतेचा इशारा दिलाय. 

'एसएमएस'द्वारे आपल्या पॉलिसीला आधार क्रमांक लिंक करण्यासंबंधीत कोणतंही नोटिफिकेश आपण जाहीर केलं नसल्याचं कंपनीनं म्हटलंय.

'सोशल मीडियात आलेल्या काही मॅसेजकडे आमचं लक्ष गेलंय... यामध्ये आमचा लोगो वापरून पॉलिसीधारकांना एसएमएस पाठवून आधारला पॉलिसी जोडण्यास सांगण्यात आलंय... परंतु, आम्ही असा कोणताही संदेश ग्राहकांना पाठवलेला नाही. तसंच एसएमएसद्वारे आधारक्रमांक पॉलिसीला जोडण्याची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही' असं एलआयसीनं स्पष्ट केलंय.

आयआरडीएनं नुकतंच आधार क्रमांक विमा पॉलिसीला जोडणं अनिवार्य आहे. नियामकनं विमा कंपन्यांना या नियमांचं पालन करण्याचे आदेश दिलेत.