मुंबई : प्रत्येक मुला-मुलीच्या आयुष्यात लग्नाचा क्षण हा येतोच. याच क्षणाचा प्रत्येक व्यक्ती आतुरतेनं वाट पाहात असतो. लग्नानंतर जोडप्याच्या आयुष्याची नवीन सुरुवात होते. त्यामुळे सर्व काही ठिक व्हावं अशी सर्वांचीच अपेक्षा असते. परंतु सगळ्यांचं आयुष्य सारखंच असेल असे नाही. जिथे चांगलं घडतं, तेथे वाईटही घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या असंच एक प्रकरण समोर आलं आहे. जे ऐकून सर्वच अवाक झाले आहेत.
खरंतर शाहजहांपूर येथे राहणाऱ्या एका तरुणाचे लग्न झाले. परंतु त्याच्या हनीमुनच्या रात्रीच त्याच्या घराची लाईट गेली. मग काय जेथे नवरदेव स्वप्न रंगवत होता. तेथे ही नववधू अंधारात त्याला 440 चा झटका देऊन गेली.
खरंतर वीज गेल्याचा फायदा घेत नववधू घरातूळ पळाली सोबत तिने घरातील पैसे आणि दागिने देखील आपल्यासोबत पळवून नेले. जेव्हा लाईट आली तेव्हा नवरदेवाच्या पायाखालची जमीनच सरकली.
पालिया दारोबस्त गावातील रहिवासी असलेल्या रमेश पाल सिंह यांनी त्यांचा मुलगा रिंकू सिंगचा विवाह कुशीनगर जिल्ह्यातील पातरबा परिसरात राहणाऱ्या काजलसोबत केला.
27 मे रोजी सर्वजण नववधूला आणायला गेले होते. त्यानंतर 28 मे रोजी वधूला गावात आणण्यात आले.
परंतु रात्री अकराच्या सुमारास वीज गेली होती. त्यामुळे घरात जास्त गरम होत असल्याने रिंकू गच्चीवर गेला. तेव्हा या अंधाराचा फायदा घेत नववधूने सोन्या-चांदीचे दागिने आणि 11 हजारांची रोकड, मोबाईल आणि इतर साहित्य घेऊन तेथून पळ काढला.
रात्री दोन वाजण्याच्या सुमारास रिंकू जेव्हा आपल्या खोलीत पोहोचला, तेव्हा त्याची पत्नी बेपत्ता होती. त्याने घराची झडती घेतली, मात्र त्याला काहीही सापडले नाही. मुख्य दरवाजाही उघडा होता. त्यानंतर या सर्वाची माहिती या नवऱ्याने इतर नातेवाईकांना दिली.
जेव्हा रंकुने पत्नीच्या नंबरवर कॉल केला, तर मोबाईल बंद असल्याचे त्याला कळले. त्यानंतर मुलाने लगेच मुलीच्या घरच्यांशी संपर्क साधला, तर तेथे देखील त्यांना उत्तर मिळालं नाही. दोन दिवसांपासून शक्य तितक्या ठिकाणी शोध घेतल्यानंतर मंगळवारी रिंकूने पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. पोलीस सध्या या संपूर्ण घटनेचा आढावा घेत आहेत.