कधी पाहिलंय का JCB आणि हत्तीची धडक? पाहा शेवटी कोण जिंकलं?

हत्तीनं मारली JCB ला धडक, कोण जिंकलं पाहा व्हिडीओ

Updated: Jan 24, 2022, 05:53 PM IST
कधी पाहिलंय का JCB आणि हत्तीची धडक? पाहा शेवटी कोण जिंकलं? title=

नवी दिल्ली : हत्ती गावांमध्ये येत असल्याचे व्हिडीओ पाहिले असतील. काहीवेळा हत्तीचं पिल्लू खेळतानाचे व्हिडीओ पाहिले असतील पण कधी त्याने JCB शी केलेली टक्कर पाहिली आहे का? सोशल मीडियावर सध्या एका व्हिडीओची चर्चा आहे. 

या व्हिडीओमध्ये हत्ती JCB ला जोरात धडक मारत असल्याचं दिसत आहे. तर जेसीबी देखील हत्तीला बाजूला करण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र हत्ती काही ऐकत नाही पुन्हा तो त्यावर धडक मारायला जातो. या दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल होत आहे. 

एका युजरने यावर प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की, ही लढाई सुरू नाही. तर हत्ती चिखलात अडकला की jcb ने त्या हत्तीला वर काढायला मदत केली त्या jcbचे तो आभार मानत आहे. 

तर दुसऱ्या युजरने हे अत्यंत वाईट असल्याचा दावा केला आहे. हत्तीला पळवून लावण्यासाठी जेसीबी वापरणं हे माणुसकीचं लक्षणं नाही असंही म्हटलं आहे. अनेकांनी या व्हिडीओवर संतापही व्यक्त केला आहे. हत्तीसोबत अशा पद्धतीनं केलेल्या वागणुकीमुळे या JCB चालकावर टीका होत आहे. 

 wild_animals_creation नावाच्या युजरने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. त्याने अनेक वाईल्डलाइफमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सध्या या व्हिडीओची खूप चर्चा होत आहे.