मुंबई : 2021 मध्ये शेअर बाजाराने चांगली तेजी नोंदवली होती. बाजारात विक्रमी तेजीच्या नोंदी देखील झाल्या. गेल्या वर्षात अनेक स्टॉक गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर ठरले. अशाच एका स्टॉकबाबत आपण जाणून घेणार आहोत.
BSE वरील KIFS हा फायनान्स स्टॉक 31 डिसेंबर 2021 रोजी 43.50 स्तरावर बंद झाला. पण, नवीन वर्षात स्टॉकने तुफान तेजी घेतली. या स्टॉकने 5 ट्रेडिंग सत्रांमध्ये 5 टक्क्यांहून अधिक अपर सर्किटसह जबरदस्त कामगिरी केली. अजूनही गुंतवणूकदारांना या शेअरकडून आणखी अपेक्षा आहेत.
KIFS चा भरघोस परतावा
KIFS Financial Services च्या स्टॉकने केवळ 12 सत्रात शेअरधारकांचा पैसा दुप्पट केला आहे. स्टॉक 5 जानेवारी 2022 रोजी 64.80 रुपयांनी वाढला होता. तर 21 जानेवारी रोजी तो स्टॉक 133.40 रुपयांवर बंद झाला होता.
एखाद्या गुंतवणूकदाराने 50 रुपये प्रतिशेअरच्या हिशोबाने 1 लाख रुपये गुंतवले असते तर, आज त्याचे 2 लाख 80 हजाराहून अधिक झाले असते.
Multibagger Stock, Multibagger Penny Stock, KIFS Financial Services, KIFS Financial Services SHARE, KIFS Financial Services STOCK, High Return Stock,