ओला टॅक्सीला जोरदार दणका, सहा महिन्यांची बंदी

खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या ओला टॅक्सीला मोठा दणका बसला आहे.  

Updated: Mar 22, 2019, 10:45 PM IST
ओला टॅक्सीला जोरदार दणका, सहा महिन्यांची बंदी title=

बंगळुरू : खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या ओला टॅक्सीला मोठा दणका बसला आहे. सहा महिन्यांची बंदी ओला टॅक्सीवर बंदी घातण्यात आली आहे. ओलाच्या कारने अनेक नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे ही बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, ओला टॅक्सीला बंदीबाबत ताकीद देण्यात आली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. शहरात ओला आणि उबेर या खासगी टॅक्सी सर्व्हिसने दररोज हजारो प्रवासी प्रवास करत असतात. कर्नाटकमध्ये ओला टॅक्सी सर्व्हिसवर सहा महिन्यांची ही बंदी आहे. कर्नाटक सरकारने ओलाचा परवाना सहा महिन्यासाठी रद्द केला आहे. त्यामुळे सध्या कर्नाटकातील सर्व ओला टॅक्सी या उभ्या आहेत.

ओलाच्या कार आणि बाईक सर्व्हिसने अनेक नियमांचे उल्लंघन केले. याबाबत तसे कळविण्यात आले होते. अनेकदा ताकीदही देण्यात आली होती. असे असताना ओला टॅक्सीकडून अनेकवेळा नियमांचे उल्लंघन करण्यात आले आहे. त्यामुळे कर्नाटकच्या परिवहन विभागाने ओलावर 18 मार्चपासून सहा महिन्यांची बंदी घातली आहे. त्यामुळे रस्त्यावर ओला टॅक्सी दिसत नाही.