VIDEO VIRAL: सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्तींमध्ये भांडण होत असेल, तर तिथे बघ्यांची गर्दी ही होतेच. काही जण हस्तक्षेप करत भांडण सोडवण्याचाही प्रयत्न करतात. तर काही जण केवळ मजा बधत उभे राहातात. पण भांडणात हस्तक्षेप करणाऱ्या व्यक्तीनेच मारहाण केली तर. सध्या गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडमधील वादाचा असाच एक व्हिडिओ (Girlfriend Boyfriend Video) सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे. ज्यामध्ये भांडण सोडवण्यासाठी आलेल्या फूड डिलिव्हरी बॉयने चक्क मुलीलाच मारहाण केली.
बॉयफ्रेंडला करत होती शिविगाळ
ही घटना ओडिशाची राजधानी भुवनेश्वर इथली आहे. भर रस्त्यात एक प्रेमी युगल भांडण करत होतं. याचे दोन व्हिडिओ व्हायरल झाले असून पहिल्यात व्हिडिओत गर्लफ्रेंड तिच्या बॉयफ्रेंडबरोबर भांडताना दिसत आहे. तसंच त्याला शिवीगाळ करताना दिसत आहे.
गर्लफ्रेंड जोरजोरात आरडाओरडा करत असल्याने गर्दी जमते, पण बॉयफ्रेंड सर्व शांतपणे ऐकून घेत असतो. याच दरम्यान ती रस्त्याच्या कडेला पडलेला दगड देखील उचलते आणि बॉयफ्रेंडच्या स्कुटरवर मारते. पण यानंतरचा दुसरा व्हिडिओ जास्त धक्कादायक आहे.
Girl direct volley of expletives, beat up Boyfriend in full public glare outside #IG Park in #Bhubaneswar pic.twitter.com/7ZVUrfz7Wd
— Mohammad Suffian (@iamsuffian) March 31, 2022
भांडणात डिलिव्हरी बॉयची एन्ट्री
प्रेमी युगलाचं भांडण पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी होते. त्याचवेळी तिथून जाणारा एक फूड डिलिव्हरी बॉय भांडणात हस्तक्षेप करत मुलीला शांत करण्याचा प्रयत्न करतो. पण त्या मुलीने मध्यस्थी करणाऱ्या डिलिव्हरी बॉयलाच शिवीगाळ केली. त्यामुळे संतापलेल्या डिलिव्हरी बॉयने भर रस्त्यात मुलीला मारहाण केली. एकामागोमाग एक तीन चार थपडा त्याने त्या मुलीला लगावल्या. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
If You want to Get Respect, 1st Give Respect..
Give Respect, Take Respect..
Yaar tum Ladki ho to kuchh bhi kar Sakte Ho ??
We Are With #Swiggy Delivery Boy...#SwiggyDeliveryBoy...#Bhubaneswar #Odisha pic.twitter.com/NKsx1dX4fS
— The South Movies (@TheSouthMovies1) March 30, 2022
लोकांनी डिलिव्हरी बॉयला केलं ट्रोल
या व्हिडिओवरुन सोशल मीडियावरुन चांगलाच वाद रंगला आहे. डिलिव्हरी बॉयच्या कृत्याबद्दल नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. काही कमेंट करणाऱ्या लोकांनी मुलीला पोलिसांत तक्रार करण्याचा सल्लाही दिला आहे. तर काही लोकांनी डिलिव्हरी बॉयचं समर्थन केलं आहे.