बदले की आग : साप चावल्यामुळे माणसाने घेतला त्याचा चावा, केले दोन तुकडे

राग इतका अनावर झाला की...

Updated: Aug 13, 2021, 10:11 AM IST
बदले की आग : साप चावल्यामुळे माणसाने घेतला त्याचा चावा, केले दोन तुकडे title=

मुंबई : 'खून का बदला खून', 'बदले की आग' यासारखे डायलॉग खूप लोकप्रिय झालेत. कारण एखादी गोष्ट आपल्यासोबत चुकीची अथवा आपल्याला न पटणारी घडली की आपण त्याचा बदला घेण्याच्या विचारात असतो. पण ही रागाची आग कुठपर्यंत असावी. बदल्याच्या भावनेने एका शेतकऱ्याने चक्क सापाचाच चावा घेतला आहे. 

ओडिशामधील जाजपूर जिल्ह्यातील सुदूर गावात एक विचित्र घटना घडली आहे.  किशोर बद्र हा आदिवासी शेतकरी शेतातील कामं उरकून येत असताना, त्याला साप चावला.  याचा राग येऊन सापाचा बदला घेण्यासाठी किशोरनं ताबडतोब या सापाला पकडलं , आणि त्याचे तुकडे तुकडे करुन मारून टाकलं, तो एवढ्यावरचं थांबला नाही त्याने या मेलेल्या सापाचे तोडांने लचके तोडले आहेत. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 

या व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. यानंतर या माणसाची जोरदार चर्चा रंगली. विषारी सापाने चावा घेतल्यामुळे त्या माणसाची काय अवस्था आहे, याबाबत सगळ्यांनाच प्रश्न पडला आहे. ४५ वर्षाच्या किशोर बद्रने या विषारी सापाचे लचके तोडले पण त्याची प्रकृती ठिक आहे. 

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. आज नागपंचमी. नागपंचमीच्या दिवशी हा व्हिडीओ समोर आल्यामुळे यावर वेगवेगळी मत समोर आली आहेत.