VIDEO : क्रिकेट खेळताना तोंडावर पडले आमदार, रुग्णालयात दाखल

Trending News : बिजू जनता दलाचे (बीजेडी) आमदार भूपेंद्र सिंह सोमवारी क्रीडा कार्यक्रमाचे उद्घाटन करताना तोल गमावून क्रिकेटच्या खेळपट्टीवर पडल्याने जखमी झाले. हा प्रकार कालाहंडी जिल्ह्यातील बेलखंडी येथे घडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Dec 30, 2023, 09:03 AM IST
VIDEO : क्रिकेट खेळताना तोंडावर पडले आमदार, रुग्णालयात दाखल  title=

Odisha MLA :  बिजू जनता दलाचे (बीजेडी) आमदार भूपेंद्र सिंह सोमवारी कालाहंडी जिल्ह्यातील बेलखंडी येथे क्रीडा कार्यक्रमाचे उद्घाटन करताना तोल गमावून क्रिकेटच्या खेळपट्टीवर पडल्याने जखमी झाले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, नार्लाचे आमदार सिंह एका क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनावेळी फलंदाजी करत असताना ही घटना घडली.

आमदाराxच्या डोक्याला दुखापत झाल्याचे त्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ७२ वर्षीय सिंह यांना तातडीने जवळच्या सामुदायिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

आमदार भूपेंद्र सिंह यांच्या पडण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.अधिकाऱ्यांनी सांगितले की, नार्लाचे आमदार सिंह एका क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनावेळी फलंदाजी करत असताना ही घटना घडली. आमदाराच्या डोक्याला दुखापत झाल्याचे त्यांनी सांगितले.