मुंबई : देशातील पश्चिमोत्तर राज्यात 'सागर' चक्रीवादळाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र आणि लक्षद्वीपला या वादळाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. सागर चक्रीवादळ सध्या यमनच्या अदन शहरापासून ३९० किलोमीटर आणि सोकोत्रा द्वीपसमूहांपासून ५६० किलोमीटर अंतरावर अदनच्या खाडीवर स्थित आहे.
याचा परिणाम म्हणून पश्चिमोत्तर राज्यातील किनाऱ्यावरील समुद्र खवळलेला राहील. त्यामुळे येत्या ४८ तासांत मासेमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असा सतर्कतेचा इशारा हवामान तज्ञ्जांनी दिला आहे.