...तर कोणतीही ताकद पाकिस्तानला तुकडे होण्यापासून वाचवू शकत नाही- राजनाथ सिंह

इतरांना पाकिस्तान तोडण्याची बिलकूल गरज नाही. किंबहुना पाकिस्तान स्वत:च ते करेल.

Updated: Sep 15, 2019, 09:10 AM IST
...तर कोणतीही ताकद पाकिस्तानला तुकडे होण्यापासून वाचवू शकत नाही- राजनाथ सिंह title=

नवी दिल्ली: पाकिस्तानने धर्माधारित राजकारण करायचे सोडले नाही तर त्यांच्या देशाचे अनेक तुकडे होतील, असे विधान केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले. ते शनिवारी सूरतमधील एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानच्या धर्माधारित राजकारणावर जोरदार टीका केली. 

यावेळी राजनाथ सिंह यांनी म्हटले की, भारताने कधीही जात, पंथ आणि धर्माच्या आधारावर राजकारण केले नाही. न्याय आणि माणुसकीच्या राजकारणावर भारताचा विश्वास आहे. याउलट काही लोकांनी धर्माच्या आधारावर भारताची फाळणी करून पाकिस्तानची निर्मिती केली. मात्र, १९७१ मध्ये धर्माच्या आधारावर अस्तित्त्वात आलेल्या पाकिस्तानची पुन्हा फाळणी झाली. भविष्यातही अशाचप्रकारचे राजकारण सुरु राहिले तर जगातील कोणतीही ताकद पाकिस्तानचे तुकडे तुकडे होण्यापासून वाचवू शकत नाही.

पाकिस्तानची पोलखोल; एअर स्ट्राईकमध्ये मारल्या गेलेल्या जवानांसाठी उभारलं स्मारक

त्यामुळे इतरांना पाकिस्तान तोडण्याची बिलकूल गरज नाही. किंबहुना पाकिस्तान स्वत:च ते करेल. सध्याच्या घडीला पाकिस्तानमध्ये बलुची, सिंधी व अन्य अल्पसंख्याक समुदायांना ज्याप्रकारे वागणूक मिळत आहे, ते पाहता पाकिस्तानचे तुकडे पडतील, असे राजनाथ सिंह यांनी सांगितले. 

काश्मीरप्रश्नी पाकिस्तानने सातत्याने संयुक्त राष्ट्रांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंतरराष्ट्रीय पातळीवर हा प्रयत्न अयशस्वी ठरल्याचेही राजनाथ सिंह यांनी सांगितले.