नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वागत करताना पुष्पगुच्छ भेट देण्याबाबत केंद्रीय गृह मंत्रालयाकडून एक आदेश देण्यात आलाय. आदेशानुसार आता देशांतर्गत दौऱ्यामध्ये पंतप्रधान मोदींचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन केले जाणार नाही. गृहमंत्रालयाकडून सर्व राज्यांना हे आदेश देण्यात आलेत.
या आदेशामध्ये असंही म्हटलंय की, जर पंतप्रधानांचे स्वागत खादीच्या रुमालात ठेवलेले एक फूल दिले तर उत्तम अथवा एखादे पुस्तकही भेट दिले जाऊ शकते.
पंतप्रधान मोदींनीच लोकांना शुभेच्छा म्हणून पुष्पगुच्छ देण्याऐवजी पुस्तक भेट देण्याचे अपील केले होते. वाचनाचा आनंद हा वेगळाच असतो तो दुसऱ्या कामातून मिळणार नाही. तसेच ज्ञानापेक्षा मोठी ताकद कोणतीच नाहीये, असेही पंतप्रधान म्हणाले होते.