Loksabha Election 2024: '...तर भाजपाला 100 जागाच जिंकेल'; नीतीश कुमार यांनी विरोधकांना सांगितला विजयाचा फॉर्म्युला

Loksabha Election 2024: सत्ताधारी भाजपानेही पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीची तयारी सुरु केली असून दुसरीकडे विरोधी पक्षाकडून पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असणार याबद्दल निश्चित नाव ठरवण्यात आलेलं नाही

Updated: Feb 18, 2023, 02:14 PM IST
Loksabha Election 2024: '...तर भाजपाला 100 जागाच जिंकेल'; नीतीश कुमार यांनी विरोधकांना सांगितला विजयाचा फॉर्म्युला title=
nitesh kumar

Nitish Kumar on Loksabha Election 2024: लोकसभेच्या (Loksabha) पुढील वर्षीच्या निवडणुकीची भारतीय जनता पार्टीसहीत (BJP) अन्य पक्षांनीही तयारी सुरु केली आहे. लोकसभा निवडणूक 2024 (Loksabha Election 2024) आतापासूनच चर्चेचा विषय ठरत असून तिसऱ्यांदा केंद्रामध्ये सत्ता मिळवण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. तर दुसरीकडे कधी संयुक्त विरोधी पक्ष तर कधी काँग्रेसशिवाय तिसरी आघाडी बनवण्याचा विचार राजकीय पक्ष करत आहेत. 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान मोदींच्या विरोधात कोणत्या नेत्याचा चेहरा पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून वापरायचा यावर सध्या विरोधी पक्षांचं एकमत झालेलं नाही. ही निवडणूक एकत्र येऊन पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर न करता लढवावी की एखाद्या नेत्याला पाठिंबा देऊन लढवावी याबद्दल विरोधी पक्षामध्ये अजूनही संभ्रम कायम आहे. विरोधी पक्षाकडून राहुल गांधी (Rahul Gandhi), नीतीश कुमार (Nitish Kumar), शरद पवार (Sharad Pawar), ममता बॅनर्जी (Mamata Banerjee), केसीआर (KCR) आणि अन्य नेत्यांची नावं चर्चेत आहेत. मात्र कोणत्याही एका नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलेलं नाही. असं असतानाच नीतीश कुमार यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाला पराभूत करण्याचा फॉर्म्युला सांगितला आहे.

...तर भाजपा 100 जागांपर्यंतच मजल मारेल

बिहारचे मुख्यमंत्री (Bihar CM) नीतीश कुमार यांनी एक मोठं विधान केलं आहे. विरोधी पक्षांनी एकत्र येऊन लोकसभा निवडणूक लढण्याची गरज असल्याचं नीतीश कुमार म्हणाले आहेत. विरोधी पक्ष एकत्र येऊन लढले तर भाजपा 100 जागांपर्यंतच (100 Seats) मजल मारु शकेल, असा विश्वास नीतीश कुमार यांनी व्यक्त केला आहे. सध्या आम्ही वाट पाहत आहोत. योग्य वेळेची आम्हाला प्रतिक्षा आहे. पण 2024 मध्ये विरोधी पक्षांनी एकत्र लढलं पाहिजे, असंही नीतीश कुमार म्हणाले. विरोधी पक्षांची एकत्र निवडणूक लढणं हाच निवडणूक जिंकण्याचा फॉर्म्युला असल्याचं नीतीश यांची सूचित केलं आहे.

नीतीश कुमार पंतप्रधानपदाचे उमेदवार?

नीतीश कुमार यांनी अनेकदा आपल्याला पंतप्रधान बनण्यात रस नसल्याचं म्हटलं आहे. मात्र त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते नीतीश कुमार यांना 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून संधी द्यावी अशी मागणी करत आहेत.

भारत यात्रा

बिहारचे मुख्यमंत्री विरोधकांना एकत्र करण्यासाठी भारत यात्रा करण्याच्या तयारीत असल्याचं मजतं. मात्र यासंदर्भात नीतीश कुमार किंवा त्यांच्या पक्षाने कोणतीही अधिकृत तारीख अद्याप जाहीर केलेली नाही.