Man Find Wife is Gangster: ..अन् त्याला कळालं पत्नी 'मोस्ट वॉण्टेड' गँगस्टर; Matrimonial App वरुन झालेलं लग्न

Man Find his wife is Gangster: दोघांची भेट एका अ‍ॅपवरुन झाली आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र तिने त्याला पहिल्या लग्नाच्या घटस्फोटाचे कागदपत्रं दिले नाही.

Updated: Feb 18, 2023, 01:39 PM IST
Man Find Wife is Gangster: ..अन् त्याला कळालं पत्नी 'मोस्ट वॉण्टेड' गँगस्टर; Matrimonial App वरुन झालेलं लग्न title=
Wife Gangster On The Run

Wife Gangster On The Run: आपण जिच्याशी लग्न केलं ती महिला एक गुंड असून आसाम पोलीस तिचा शोध घेत असल्याची माहिती मिळल्यानंतर गुजरातमधील पोरबंदर येथील एका व्यक्तीने थेट कोर्टात धाव घेतली आहे. आपल्याला घटस्फोट हवा आहे अशी मागणी या व्यक्तीने केली आहे. या व्यक्तीचं नाव विमल करिया असं आहे.

मॅट्रीमोनियल अ‍ॅपवरुन भेट

एका मॅट्रीमोनियल अ‍ॅपवर विमलची ओळख या महिलेशी झाली. लग्न वगैरे झालं. मात्र आपली पत्नी ही आसाममध्ये मोस्ट वॉण्टेड आरोपी आहे हे विमलला कळाल्यानंतर त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. ही महिला फसवणूक, चोरी, खून आणि शिकारीच्या प्रकरणांमध्ये आसाममध्ये मोस्ट वॉण्टेड आहे.

कागदपत्रं दिली नाही

पोरबंदलच्या पोलीस निरिक्षकांकडे विमलने तक्रार दाखल केली आहे. यामध्ये त्याने रिता दासला आपण गुवहाटीमध्ये भेटलो होतो असं म्हटलं आहे. एका मॅट्रोमोनियल अॅपवरुन हे दोघं भेटले होते. रिताने ती घटस्फोटीत असल्याचं आपल्या बायोमध्ये लिहिलं होतं. दोघांनी बोलायला सुरुवात केल्यानंतर काही दिवसांमध्येच लग्न करण्याचा निर्णय घेतला. विमलने रिताकडे तिच्या आधीच्या घटस्फोटाचे कागदपत्र मागितले. मात्र रिताने त्याला आपण पंचायतीसमोर लग्न केलं होतं. त्यामुळे लग्नाचं सर्टीफिकेट आणि इतर कागदपत्रं आपल्याकडे नाहीत असं तिने सांगितलं.

लग्नानंतर ती 6 महिन्यांमध्ये निघून गेली

विमलने रितावर विश्वास ठेवला आणि दोघे अहमदाबादमध्ये लग्नबंधनात अडकले. लग्नानंतर 6 महिन्यानंतर रिता घर सोडून निघून गेली. आपल्याला आसाममध्ये काही काम असल्याचं सांगत ती घरातून निघून गेली आणि पुन्हा परतलीच नाही. रिता दासविरोधात आसाम कोर्टाने नॉन-बेलेबल अरेस्ट वॉरंट जारी केलं आहे. रिताला तिच्या आईचा फोन आल्याने जमीनीसंदर्भातील वाद मिटवण्यासाठी ती आसामला गेल्याचं विमलने सांगितलं. रिताच्या वकिलांनी कॉल करुन तिच्याविरोधात खटला दाखल करण्यात आल्याचं सांगत प्रकरण फार गंभीर नसल्याचं सांगितलं.

रिताचा दावा काय?

यासंदर्भात एका वृत्तपत्राशी बोलताना रिताने आपण अजूनही विवाहित असल्याचं सांगितलं. "मी 2007 साली अनिलशी लग्न केलं. कार चोरीची केस माझ्याविरोधात 2015 मध्ये दाखल करण्यात आली. तेव्हापासून मी अनिलशी एकदाही बोलेले नाही. सध्या अनिल चौहान हा तुरुंगात आहे," असं रिताने सांगितलं.

कार चोरी प्रकरण काय?

रिताने आपला या कार चोरी प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचा दावा केला आहे. मात्र 2015 साली तिला आसाम विधानसभेच्या आवारातून बीएमडब्ल्यू गाडी चोरल्याच्या गुन्हाखाली अटक करण्यात आली होती. गुवहाटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रितानेच अनिलला विधानसभेमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी पास काढून दिला होता. माजी आमदार रुमी नाथ हे रिताचे मित्र होते. त्यांच्या मदतीने रिताने हा पास मिळवला होता. मात्र या आमदाराला अनिल हा कार चोरी करणारा असल्याचं माहिती नव्हतं. 

गुगलवरही मिळते तिच्याबद्दलची माहिती

विमलने घटस्फोटासाठी अर्ज केला असून आपल्या पत्नीचं अडनाव हे शर्मा नसून रिता चौहान असल्याचं त्याला कळालं. गुगलवर रेखा चौहान सर्च केलं तरी ती आसाममधील वॉण्टेड लिस्टमध्ये असल्याचं स्पष्ट होत आहे.