'...तर साखर आयात करू देणार नाही'

साखरेचा साठा २१ टक्क्यांपेक्षा जास्त नको असं सरकारचं धोरण आहे. 

Updated: Sep 27, 2017, 09:27 PM IST
'...तर साखर आयात करू देणार नाही' title=

नवी दिल्ली : साखरेचा साठा २१ टक्क्यांपेक्षा जास्त नको असं सरकारचं धोरण आहे. मात्र देशात अनेक ठिकाणी साखर खरेदीबाबत उदासिनता दिसून येत असल्याचा मुद्दा माजी कृषीमंत्री शरद पवारा यांनी मांडला आहे. 

साखरेचा दर ४५ रुपयांच्या आत राहणार असतील तर साखर आयात करू देणार नसल्याचा निर्धार केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी केलाय. दिल्लीत नॅशनल फेडरेशन ऑफ कांपरेटिव्ह सुंदर फॅक्टरीज लिमिटेडनं साखर उद्योगातल्या समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाला नितीन गडकरी आणि शरद पवार उपस्थित होते.