देशात लवकरच हवेत उडणारी बस ? केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा

प्रयागराजमध्ये हवेतून चालणा-या या बसचा पहिला प्रयोग केला जाणार आहे.

Updated: Feb 17, 2022, 10:37 PM IST
देशात लवकरच हवेत उडणारी बस ? केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा title=

मुंबई : जगभरात उडणाऱ्या कारचे प्रयोग सुरू आहेत. काही देशांनी आता त्याला परवानगीही दिली आहे. पण भारतात मात्र उडती बस येणार आहे. हे खुद्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केलं आहे. आपण आतापर्यंत सिनेमात किंवा स्वप्नात पाहिलेल्या उडणाऱ्या गाड्या आपल्या खऱ्या आयुष्यात देखील पाहा येणार आहे. हे तर असं झालं की, प्रियांका चोप्राच्या 2050 हा सिनेमातील दृश्य आता काही वर्षातच पूर्ण झालेलं पाहायला मिळेल.

त्यामुळे सिनेमात पाहिलेलं ते दृश्य खरं होताना पाहण्यासाठी तुम्हाल 2050 पर्यंत थांबालयला लागण्याची गरज नाही असं नितीन गडकरी यांच्या घोषणे नंतर वाटंय.

प्रयागराजमध्ये हवेतून चालणा-या या बसचा पहिला प्रयोग केला जाणार आहे. अर्थात ही बस फ्लाइंग कारसारखी नसेल, तर ती असेल केबल बस.

रोप-वेप्रमाणे एका जाडजूड केबलवरून बस पुढे सरकेल. त्यासाठी मोठमोठ्या खांबांवर स्थानकं बांधली जातील. तसेच एका बसची क्षमता 15 ते 20 प्रवासी वाहून नेण्याची असेल. हवेतूनच बस जाणार असल्यामुळे ट्रॅफिकची कटकटही कायमची टळेल. असे गडकरींचं म्हणणं आहे.

उडणारी कार किंवा टॅक्सी देशात येईल तेव्हा येईल. मात्र आता प्रयागराजमध्ये हवेतून चालणारी केबल बस लवकरच येईल. हा प्रयोग राबवल्यास मुंबई-पुण्यासारख्या शहरांची वाहतूक समस्या सुटायला देखील मदत होईल. त्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष आता या बसकडे आहे.