बलात्काराचा आरोपी नित्यानंदनं स्थापला नवीन देश, हिंदूंना आवाहन...

भारतातून फरार झालेल्या स्वयंभू बाबा नित्यानंदचा शोध सुरू आहे

Updated: Dec 5, 2019, 08:09 PM IST
बलात्काराचा आरोपी नित्यानंदनं स्थापला नवीन देश, हिंदूंना आवाहन... title=

नवी दिल्ली : बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला स्वयंघोषित बोगस बाबा नित्यानंद याने इक्वेडोर देशाजवळ एका बेटावर स्वतःचा देश स्थापन केल्याचं सांगितलं जातंय. या देशाला त्याने 'कैलास' असं नाव दिल्याचं समजतंय. हा भोंदूबाबा देशातून पळून गेलाय. त्याचा शोध सुरू आहे. नित्यानंदचं हे बेट कॅरेबियन बेट समुहात त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या जवळपास असल्याची माहिती आहे. बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यावर नित्यानंद नेपाळमार्गे देश सोडून पळाला होता. या देशाची नित्यानंदने वेबसाईटही तयार केलीय. 'हिंदू धर्म ज्यांना आचरणात आणायचा आहे किंवा ज्यांना हिंदू व्हायचं आहे त्या सर्वांना या देशाचं नागरिकत्व मिळेल' असं त्यानं म्हटलंय. विशेष म्हणजे या वेबसाईटच्या मते या कैलास देशात हिंदीला स्थान नाही. इंग्लिश, संस्कृत आणि तामिळ या अधिकृत भाषा असल्याचं म्हटलंय. कैलास देशाचा पासपोर्ट आणि ध्वजही त्याने तयार केल्याचं सांगण्यात येतंय. 

अधिक वाचा - 'एका वर्षांत अशी गाय बनवेन जी स्पष्ट संस्कृत - तामिळ बोलेल'

भारतातून फरार झालेल्या स्वयंभू बाबा नित्यानंदचा शोध सुरू आहे. गुजरात पोलिसांनी २२ नोव्हेंबर रोजी नित्यानंदच्या अहमदाबाद आश्रमाची झाडाझडती घेतली होती. परंतु, इथं त्यांच्या हाताला काहीही लागलं नाही. 

NBT
'कैलास'चा ध्वज

kailaasa.org या वेबसाईटवर त्यानं आपल्या कैलास या नवीन देशाबद्दल माहिती दिलीय. हा देश त्यांच्यासाठी आहे जे आपल्याच देशात हिंदू असण्याचा हरवलाय, असं त्यानं याबद्दल म्हटलंय. यासाठी त्यानं आपल्या देशातील पासपोर्टला 'पारपत्रम' असं नाव दिलंय. 

अधिक वाचा - 'कामांध' बाबा नित्यानंद गजाआड

कैलास या देशाची कल्पना अमेरिकेत अस्तित्वात आल्याचंही त्यानं म्हटलंय. सनातन हिंदू धर्माच्या रक्षणासाठी हा देश अस्तित्वात आल्याचं या भोंदूबाबानं म्हटलंय. 'कैलास'ला पुन्हा एकदा जिवंत करणारा साधू असा उल्लेख या वेबसाईटवर नित्यानंदबद्दल करण्यात आलाय. नित्यानंदच्या या देशात त्याचं सरकार आहे तसंच त्यात गृह, अर्थ अशी खातीही आहेत. 

गुजरात पोलीस अजूनही नित्यानंदच्या शोधात आहेत. परंतु, आत्तापर्यंत त्यांनी इंटरपोलला संपर्क केल्याची माहिती नाही. नित्यानंदवर कर्नाटकात बलात्कार आणि अपहरणाचा गुन्हा दाखल आहे. तसंच गुजरातमध्येही त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल आहे.  

अशा पद्धतीनं देश खरेदी करता येऊ शकतो?

उल्लेखनीय म्हणजे, दक्षिण अमेरिकेत इक्वेडोरसारखेच अनेक बेटावरील देश आहेत. इथं कुणीही खासगी बेट खरेदी करू शकतं. साध्या शब्दांत सांगायचं तर एखादी जमीन खरेदी करण्यासारखाच हा प्रकार आहे. नित्यानंदनंही इक्वॅ़डोरमध्ये बेट खरेदी केलंय.

परंतु, कुणीही बेट खरेदी करून स्वत:च त्याला देश म्हणून घोषित करू शकत नाही. जगातील इतर देशांसहीत संयुक्त राष्ट्राची त्याला मान्यता मिळणं आवश्यक आहे.