२३ वर्षीय TikTok स्टार; ठेवू लागली बॉडीगार्ड

टिकटॉकवर तरुणीचे १.६ कोटी फॉलोवर्स आहेत.

Updated: Dec 5, 2019, 08:07 PM IST
२३ वर्षीय TikTok स्टार; ठेवू लागली बॉडीगार्ड title=
फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

नवी दिल्ली : सोशल मीडिया एखाद्या व्यक्तीला कुठून कुठे पोहचवेल याचा काही नेम नाही. एका २३ वर्षीय तरुणीसोबत अशाच प्रकारची एक घटना घडली आहे. टिकटॉक अॅपवरील व्हिडिओमुळे तरुणी इतकी प्रसिद्ध झाली आहे की, ती स्वत:साठी सुरक्षा रक्षक ठेवू लागली आहे. टिकटॉकवर तरुणीचे १.६ कोटी फॉलोवर्स आहेत. यामुळे ती अतिशय प्रसिद्ध आणि आर्थिकदृष्ट्या संपन्न झाली आहे. तिच्या आईने नोकरीही सोडल्याची माहिती मिळत आहे. 

सोशल मीडियावर या तरुणीचं नाव holly h आहे. जी ब्रिटेनची मोठी सुपरस्टार बनली आहे. तिचा टिकटॉक व्हिडिओ केवळ १५ सेकंदात संपतो. पण लोकांमध्ये तिची प्रसिद्धी जबरदस्त आहे. गेल्या वर्षी टिकटॉकवर अपलोड करण्यात आलेल्या तिच्या एका छोट्याशा व्हिडिओ क्लिपला जवळपास ७.७२ हजार वेळा पाहण्यात आलं आहे. 

 
 
 
 

A post shared by Holly H (@hollyh) on

 
 
 
 

A post shared by Holly H (@hollyh) on

इंटरनेटवर या तरुणीला मोठं स्टारडम मिळालं आहे. तिच्या या यशावर तिची आईदेखील खुश आहे. 'द मेल'ने दिलेल्या माहितीनुसार, तिच्या या यशाबाबत तिची आई म्हणते, 'ही गोष्ट काहीशी विचित्र वाटते. मला खरंतर हे समजत नाही, पण ती यातून पैसे कमवत आहे. त्यामुळे आम्हीदेखील तिच्यासोबत आहोत. हे आकर्षक करियर आहे. या सर्व प्रकाराने मी अतिशय आश्चर्यचकित असल्याचं' तरुणीच्या आईने म्हटलंय. 

 
 
 
 

A post shared by Holly H (@hollyh) on

होली आतापर्यंत तिच्या भावंडांसोबत राहत होती. पण आता जाहिरातदार आणि एजंट्सना भेटण्यासाठी ती एका चार बेडरुमच्या घरात शिफ्ट झाल्याची माहिती मिळत आहे. ती एखाद्या कार्यक्रमात असल्यास तिच्यासोबत तिच्या सुरक्षा-रक्षकांची टीम असते. आपल्या या यशाबाबत बोलताना होली, हे अतिशय सुंदर असल्याचं सांगते.