Nithari Case : देशभरात गाजलेल्या निठारी हत्याकांडातील आरोपींची फाशी रद्द, घरात सापडलेले मुलांच्या मृतदेहाचे तुकडे

Nithari Case: बहुचर्चित निठारी हत्याकांडातील मुख्य आरोपी सुरेंदर कोली आणि मनिंदर सिह पंढेर यांच्या फाशीची शिक्षा रद्द करण्यात आली आहे. अहलाहाबाद हाय कोर्टाने (Allahabad High Court) हा निकाल दिला आहे. 

राजीव कासले | Updated: Oct 16, 2023, 01:27 PM IST
Nithari Case : देशभरात गाजलेल्या निठारी हत्याकांडातील आरोपींची फाशी रद्द, घरात सापडलेले मुलांच्या मृतदेहाचे तुकडे title=

Allahabad High Court decision on Nithari Case: देशभरात गाजलेल्या निठारी हत्याकांडातील प्रमुख आरोपी सुरेंदर कोली (Surendra Koli) आणि मनिंदर सिंह पंढेर (Moninder Singh Pandher)  यांच्या फाशीची शिक्षा रद्द करण्यात आली आहे. आरोपी सुरेंदर कोली आणि मनिंदर संह पंढेर यांनी फाशीच्या शिक्षेला कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना अलाहाबाद हायकोर्टाने या दोन्ही आरोपींच्या फाशीची शिक्षा रद्द केलीय. 

गाझियाबाद कोर्टाने सुनावली होती फाशी
2005-06 मध्ये उत्तर प्रदेशच्या निठारीमध्ये झालेल्या अपहरण, बलात्कार आणि हत्या प्रकरणात सीबीआयने आरोपी सुरेंदर कोली आणि मनिंदर सिंह पंढेर यांच्याविरोधात एकूण 16 गुन्हे दाखल केले होते. यातल्या 14 प्रकरणात गाझियाबादच्या सीबीआय (CBI) कोर्टाने सुरेंदर कोलली फाशीची शिक्षा सुनावली होती. तर 6 पैकी 3 प्रकरणात मनिंदर सिंह पंढेरच्या विरोधात फाशीची शिक्षा सुनावली होती. दोन प्रकरणात निर्दोष मुक्तता केली होती. 

आरोपींनी हायकोर्टात घेतली होती धाव
निठारी हत्याकांडातील आरोपी सुरेंदर कोली आणि मनिंदर सिंह पंढेर यांनी फाशिच्या शिक्षेविरोधात अलाहाबाद हाय कोर्टात याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी करताना केवळ वैज्ञानिक आणि परिस्थितीजन्य पुराव्यांच्य आधारावर दोघांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्याचं हायकोर्टाने सांगितलं. या घटनेचा कोणीही प्रत्यक्ष साक्षीदार नाहीए त्यामुळे या प्रकरणात सुनावणी करताना न्यायाधीश अश्वनी कुमार मिश्र आणि न्यायाधशी एस एच ए रिझवी यांच्या खंडपीटाने दोघांच्या फाशीची शिक्षा रद्द केली

काय होतं निठारी हत्याकांड?
2005-06 साली घडलेल्या उत्तर प्रदेशमधल्या नोएडा इथल्या निठारीत भीषण हत्याकांड उघडकीस आलं. या घटनेने संपूर्ण देश हादरला. 2006 मध्ये एका व्यक्तीने आपली मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार नोएडाच्या सेक्टर-20 पोलीस स्थानकात दाखल केली. तक्रारीत मनिंदर सिंह पंढेरने त्या मुलीला नोकरी देण्यासाठी बोलवलं, पण यानंतर ती घरी परतलीच नाही, असं  या तक्रारीत उल्लेख करण्यात आलं. याप्रकरणात पोलिसांनी तपास सुरु केला. तपासाता पोलिसांना धक्कादाय माहिती हाती लागली. 29 डिसेंबर 2006 मध्ये पंढेरच्या बंगल्याच्या मागच्या नाल्यात लहान मुलं आणि महिलांच्या शरीराची हाडं सापडली. यानंतर पोलिसांनी मनिंदर पंढेर याचा नोकर सुरेंदर कोलीला अटक केली. 

या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे झाले. यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपावण्यात आलं. सुरेंदर कोली आणि मनिंदर पंढेर यांच्यावर हत्या, अपहरण आणि बलात्काराचे आरोप लावलण्या आले. या दोघांवर पुरावे नष्ट करण्याचा आरोपही लावण्यात आला.