मोठी बातमी: केंद्र सरकारकडून कॉर्पोरेट टॅक्समध्ये मोठी कपात

भांडवली बाजारात या घोषणेचे सकारात्मक पडसात उमटताना दिसले.

Updated: Sep 20, 2019, 11:37 AM IST
मोठी बातमी: केंद्र सरकारकडून कॉर्पोरेट टॅक्समध्ये मोठी कपात title=

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी शुक्रवारी भारतीय अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठीच्या आर्थिक उपाययोजनांचे नवे पॅकेज जाहीर केले. या अंतर्गत केंद्र सरकारने कॉर्पोरेट करात मोठी कपात केली आहे. त्यामुळे उद्योगक्षेत्राला मोठा दिलासा मिळाला आहे. 

भांडवली बाजारात या घोषणेचे सकारात्मक पडसात उमटताना दिसले. त्यामुळे सेन्सेक्सने ८०० तर निफ्टीने २०० अंकांनी उसळी घेतली. 

अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत यासंदर्भात सविस्तर माहिती दिली. त्यानुसार भारतीय कंपन्यांसाठीचा कॉर्पोरेट टॅक्स २५.१७ टक्क्यांपर्यंत खाली आणण्यात आला. हे नवे दर तातडीने लागू होतील. यामुळे सरकारी तिजोरीवर १.४५ लाख कोटींचा बोजा पडणार आहे. मात्र, या निर्णयामुळे देशातील गुंतवणूक आणि विकासाला चालना मिळेल, असे सितारामन यांनी सांगितले.

केंद्र सरकारने केलेल्या प्रमुख घोषणा:
* १ ऑक्टोबर २०१९ नंतर स्थापन झालेल्या कंपन्यांसाठी अधिभार आणि सेस धरून कॉर्पोरेट टॅक्स १७.०१ टक्के इतका असेल.
* मिनिमम अल्टरनेट टॅक्स (एमएटी) १८.५ टक्क्यांवरून १५ टक्क्यांवर
* कॉर्पोरेट कंपन्यांसाठी १.४५ लाख कोटींचे आर्थिक पॅकेज
* फॉरेन पोर्टफोलिओ गुंतवणुकीवरील कॅपिटल गेन्स टॅक्स रद्द