NIFTY या आठवड्यात 18 हजाराच्या शिखरावर पोहचण्याची शक्यता; हे फॅक्टर आहेत महत्वाचे

मागील आठवड्यात तुफान तेजीत असलेला शेअर बाजार या आठवड्यात देखील तेजीत राहण्याची शक्यता आहे.

Updated: Sep 20, 2021, 08:08 AM IST
NIFTY या आठवड्यात 18 हजाराच्या शिखरावर पोहचण्याची शक्यता; हे  फॅक्टर आहेत महत्वाचे title=

मुंबई : मागील आठवड्यात तुफान तेजीत असलेला शेअर बाजार या आठवड्यात देखील तेजीत राहण्याची शक्यता आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा (NSE) निर्देशांक निफ्टी (NIFTY)17792 च्या उच्चांकी स्तरावर पोहचला होता. शुक्रवारी निफ्टी 17800 च्या खाली बंद झाला होता. गुंतवणूकदारांनी उच्चांकी स्तरावर विक्री केली त्यामुळे तेजीला काहीसा ब्रेक लागला. एक्सपर्टचे म्हणणे आहे की, येणाऱ्या काही दिवसात निफ्टी 18000 चा स्तर पार करू शकते. 2021 वर्षात इंडेक्सने आतापर्यंत 25 टक्क्यांनी उसळी घेतली आहे.

शुक्रवारी बाजारात प्राफिट बुकिंग पहायला मिळाली. काही दिवसांपासून बाजारात सलग तेजी सुरू आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी विक्री सुरू केली. दरम्यान ग्लोबल मार्केट तेजीत आहे. निफ्टी 18 हजाराचा आकडा पार करण्यासाठी काही महत्वाचे फॅक्टर भूमिका बजावू शकतात. यासाठी 17440 - 17295 सपोर्ट झोन असणार आहे.

45 वी GST परिषदेची बैठक
जीएसटी परिषदेच्या बैठकीत कोविड 19 च्या औषधांवर कॅंसेसनल टॅक्स रेट वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच कॅसरच्या औषधांवर टॅक्स कमी करण्यात आले आहे. सोबतच काही महागड्या औषधांवरील आयातीवर जीएसटी काढून टाकण्यात आला आहे. परंतु पेट्रोल डिझेल जीएसटीच्या कक्षेतून बाहेर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

अमेरिकेच्या फेडरल रिझर्वची बैठक
युएस फेडची 21 आणि 22 सप्टेंबर रोजी बैठक होणार आहे. यामध्ये बॉंड खरेदीबाबत होणाऱ्या निर्णयाकडे बाजाराचे लक्ष असणार आहे.

बँक ऑफ जपानची बैठक
बँक ऑफ जपानची बैठक 22 सप्टेंबरला होणार आहे. मॉनिटरी पॉलिसी समितीबाबत ही बैठक होणार आहे.

डॉलर इंडेक्स
डॉलर इंडेक्स 3 आठवड्यांच्या उच्चांकावर आहे. युएस रिटेल डाटा मजबूत आल्याने डॉलरला सपोर्ट मिळाला आहे. 

FII एक्टिविटी
गेल्या आठवड्यात फॉरेन इंस्टिट्यूटशनल इन्वेस्टर्स(FIIs)बाजारात नेट बायर्स होते. FIIsने सप्टेंबरमध्ये आतापर्यंत बाजारात 7200 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

बँक शेअर
गेल्या आठवड्यात बँक निफ्टीमध्ये दमदार तेजी दिसून आली. इंडेक्समध्ये ब्रेकआऊट दिसून आला त्यामुळे बँक निफ्टी 40 हजाराच्या स्तराच्या दिशेने वाढत आहे.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x