लवकरच चलनात येणार १०० रूपयांचे नाणे

एक हजार रुपयांची नोट रद्द करून पाचशे आणि हजार रूपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्यावर केंद्र सरकार आणखी एका मोठ्या बदलाच्या तयारीत आहे. लवकच तुम्हाला १०० रूपयांचे नाणे चलनात आलेले पहायला मिळेल. केवळ १०० रूपयांचेच नव्हे तर, ५ रूपयांचेही नवे नाणे चलणात आलेले पहायला मिळेल.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Sep 12, 2017, 11:18 PM IST
लवकरच चलनात येणार १०० रूपयांचे नाणे title=

नवी दिल्ली : एक हजार रुपयांची नोट रद्द करून पाचशे आणि २ हजार रूपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्यावर केंद्र सरकार आणखी एका मोठ्या बदलाच्या तयारीत आहे. लवकरच तुम्हाला १०० रूपयांचे नाणे चलनात आलेले पहायला मिळेल. केवळ १०० रूपयांचेच नव्हे तर, ५ रूपयांचेही नवे नाणे चलनात आलेले पहायला मिळेल.

मीडिया रिपोर्टनुसार सरकार लवकरच ही दोन्ही नाणी लॉंच करण्याची शक्यता आहे. अर्थात कोणतेही नाणे, नवे चलन, त्यातील बदल याबाबत सरकार निर्णय घेत असते. तर, रिझर्व्ह बॅंक तो निर्णय प्रत्यक्ष अमलात आणते. सरकार १०० आणि ५ रूपयांची नवी नाणी डॉ. एम. जी. रामचंद्रन यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधत चलनात आणण्याची शक्यता आहे.

१०० रूपयांचे नवे नाणे १०० मिलिमिटरचे असून, त्याचे वजन ३५ ग्रॅम इतके असणार आहे. नाण्याच्या एका बाजूला अशोक स्तंभाचे चित्र दिसेल. या चित्राच्या खालच्या बाजूला सत्यमेव जयते ही अक्षरे झळकतील. तर, अशोक स्तंभाच्या एका बाजूला भारत तर, दुसऱ्या बाजूला इंडिया लिहिलेले असेल.