रॉबर्ट वाड्रा रूग्णालयात दाखल

सोमवारी संध्याकाळी वाड्रा यांना मेट्रो रूग्णालयात दाखल करण्यात आलं.

Updated: Oct 22, 2019, 10:02 AM IST
रॉबर्ट वाड्रा रूग्णालयात दाखल  title=

नवी दिल्ली :  पाठीत अचानक दुखायला लागल्यामुळे सोनिया गांधींचे जावई रॉबर्ट वाड्रा यांना नोएडा येथील रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सोमवारी संध्याकाळी वाड्रा यांना मेट्रो रूग्णालयात दाखल करण्यात आलं. अजूनही त्यांना डिस्चार्ज मिळालेला नाही. रूग्णालयाने वाड्रा य़ांच्या प्रकृतीविषयी अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. 

रॉबर्ट वाड्रा यांच्यासह प्रियंका वाड्रा देखील रूग्णालयात उपस्थित आहेत. वाड्रा यांना रूग्णालयात दाखल केल्यामुळे एसपीजीने मेट्रो रूग्णालयाला घेरलं आहे. तर काही काँग्रेस नेतेही रूग्णालयात दाखल झाले आहेत. 

त्याचप्रमाणे, काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी-वाड्रा आज दोन दिवसांच्या रायबरेलीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. याठिकाणी पक्ष मजबुतीकरणासाठी कार्यकर्त्यांशी त्या चर्चा करणारेत. काँग्रेस पदाधिकाऱ्यांसाठी आयोजित कार्यशाळेतही त्या हजेरी लावणार आहेत.