मुंबई : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) अर्थात इपीएफओने सर्व पीएफधारकांसाठी एक अलर्ट जारी केला आहे. कोणत्याही पीएफधारकाने चुकूनही खात्याशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करू नये. यामुळे पीएफधारकाची फसवणूक होण्याची शक्यता आहे, असं आवाहन ईपीएफओने केलं आहे. जर ईपीएफ खात्याची (EPF Account) माहिती फसवणूक (Online Fraud)करणाऱ्यांच्या हाती लागली तर ते तुमच्या खात्यातून रक्कम आपल्या खातात वळती करु शकतात. त्यामुळे सावध राहण्याचा इशारा इपीएफओने दिला आहे. इपीएफओने ट्विट करत पीएफधारकांना सतर्क केलंय. (never share your personal details otp pan uid details on phone and social media epfo given advice to pf holders)
इपीएफओ कधीही पीएफधारकाकडे आधार, पॅन, UAN आणि बँक तपशीलांची माहिती मागत नाही. जर कुणी मोबाईल किंवा सोशल मीडियावर अशी माहिती मागत असेल तर देऊ नका. अशा फसव्या कॉलला रिप्लाय देऊ नका. आपली माहिती त्यांना सांगू नका, असंही इपीएफओने स्पष्ट केलंय.
"ईपीएफओकडून कधीही पीएफधारकाकडे आधार, पॅन, यूएएन, बँक खातं आणि ओटीपीची मागणी केली जात नाही. तसेच ईपीएफओ कधीही कोणत्याही सेवेसाठी व्हॉट्सअॅप, सोशल मीडियाद्वारे कोणतीही रक्कम जमा करण्यास सांगत नाही"ईपीएफओ पुढे म्हणतो", असं इपीएफओने ट्विटमध्ये म्हटलंय.