मुंबई : NEET Counselling 2021 Cut-Off : पदवीपूर्व वैद्यकीय आणि आयुष अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (NEET 2021) चा निकाल जाहीर झाला आहे. आता उमेदवार NEET साठी अर्ज करू शकतात. तसेच सगळे उमेदवार आता NEET UG Counselling 2021 सुरू होण्याची वाट पाहत आहेत.
उमेदवारांना MCC NEET Counselling 2021 च्या माध्यमातून विभिन्न मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळणार. NEET ग्रॅज्युएट मेडिकल कोर्सेसमध्ये एडमिशनकरता ही एकमात्र परीक्षा आहे. ज्याच्या कट-ऑफच्या आधारावर उमेदवार काऊंसिलींगमध्ये सहभाही होऊ शकतात.
महाविद्यालयांमधील प्रवेश हे महाविद्यालयांनी ठरवलेल्या कट ऑफवर अवलंबून असतात. कॉलेजने ठरवून दिलेल्या किमान कट ऑफ स्कोअर करणाऱ्या विद्यार्थ्यांना समुपदेशनासाठी बोलावले जाईल. बहुतेक विद्यार्थी प्रथम शासकीय महाविद्यालयांच्या जागांवर प्रवेश मिळविण्याचा प्रयत्न करतात. यासाठी कट ऑफ देखील जास्त आहे. 2020 मध्ये सरकारी महाविद्यालयांमधील यादी.
कॉलेज |
जनरल कॅटेगिरी |
SC कॅटेगिरी | ST कॅटेगिरी |
मौलाना आझाद मेडिकल कॉलेज, नवी दिल्ली | 90 | 1475 | - |
वीएमएमसी आणि सफदरजंग अस्पताल, नवी दिल्ली | 163 | 2050 | |
यूनिवर्सिटी कॉलेज ऑफ मेडिकल साइंसेज, नवी दिल्ली | 324 | 3207 | |
लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज, नवी दिल्ली | 571 | 13646 | 19752 |
गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, चंदीगड | 776 | 16444 | |
सेठ जीएस मेडिकल कॉलेज, मुंबई | 457 | 2065 | 26559 |
किंग जॉर्ज मेडिकल यूनिवर्सिटी, लखनऊ | 1800 | 7765 | 38458 |
स्टेनली मेडिकल कॉलेज, चेन्नई | 5253 | 42321 | 57079 |
पं. भागवत दयाल शर्मा स्नातकोत्तर आयुर्विज्ञान संस्थान, रोहतक | 6573 | 52059 | 68549 |
ग्रांट मेडिकल कॉलेज और सर जेजे ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स, मुंबई | 2828 | 23997 | 48835 |
ऑनलाइन समुपदेशनाचे वेळापत्रक लवकरच MCC च्या अधिकृत वेबसाइट mcc.nic.in वर प्रसिद्ध केले जाणार आहे. NEET 2021 परीक्षेत पात्र ठरलेले उमेदवार याकडे लक्ष देऊ शकतात.