उद्धव ठाकरे यांच्यावर नवनीत राणा यांची टीका, 'लाचार मुख्यमंत्र्यांची लाचार सभा'

​Navneet Rana criticize on Uddhav Thackeray : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.  

Updated: May 15, 2022, 01:08 PM IST
 उद्धव ठाकरे यांच्यावर नवनीत राणा यांची टीका, 'लाचार मुख्यमंत्र्यांची लाचार सभा' title=

नवी दिल्ली : Navneet Rana criticize on Uddhav Thackeray : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. लाचार मुख्यमंत्र्यांची लाचार सभा, अशी नवनीत राणा यांनी टीका केली आहे.  शेतकरी, वीज तुटवडा यावर कोणतेही भाष्य केले नाही. अडीच वर्ष मुख्यमंत्री कार्यालयात गेले नाहीत. मुख्यमंत्री एकातरी  शेतकऱ्याच्या घरी गेले का, असा सवाल उपस्थित केला.

 बेरोजगारीवर एक शब्द बोलले नाहीत. तीन पटीने बेरोजगारी वाढली आहे. संभाजीनगर नामकरण करणे काय गरज होती, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला. मोदी 370 कलम हटवू शकतात पण मुख्यमंत्री औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण करु शकत नाही. गदा हातात दिल्यावर ती घ्यावी लागते, पण मुख्यमंत्र्यांनी गदा हातात घेतली नाही. फक्त स्पर्श करुन सोडली. गदा तुम्हाला अनटचेबल आहे का, हनुमान चालिसा पठन कश्मिरात जाऊन करा, असे मुख्यमंत्री म्हणतात. पण महाराष्ट्रात हनुमान चालिसा पठन करु दिलं जात नाही, असे त्या म्हणाल्या.

औरंगजेबच्या कबरीवर फुल वाहिली त्यावर एक शब्द बोलले नाही. शिवसेना औरंगजेब सेना बनलीय का ? जर बाळासाहेब ठाकरे असते तर औरंगजेबच्या कबरीचे ज्याने फुले वाहिली त्याला त्याच कबरीत गाडले असते. विचारधारा नुसार आपल्या देवाला विसरले. मुन्नाभाई फिल्म सुपरहीट होती. तुम्ही फ्लॅाप होणार. उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला सह्योगी पक्षांनी अटी घातल्या होत्या. शिवभोजन थाली भ्रष्टाचाराचा अड्डा बनलीय. मोदीजींचे फोटो लावून मते मागितली. काश्मिरी पंडीतांचे बलिदान व्यर्थ गेले नाही.  हे कलम हटवले जावे ही बाळासाहेबांची इच्छा होती… ती इच्छा मोदींनी पूर्ण केली. जेंव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी नसतील. सत्तेत नसतील तेंव्हा रश्मी ठाकरे यांना जेलमध्ये टाकल्यावर  मी विचारेन की पीडा कशी असते? बीकेसी मैदानात हनुमान चालिसा पठन करणार आहे. उद्धव ठाकरे यांनी हनुमान चालिसाचा अवमान केला, अशी टीका राणा यांनी केली. 

 दाऊदच्या जवळचे लोक मंत्री मंडळात अजूनही आहेत. दाऊदशी कोणाचे संबंध आहेत हे लोकांना कळालंय. मुंबईचा बाप फक्त छत्रपती शिवाजी महाराज आहेत, असे नवनीत राणा म्हणाल्या.