गरीबीमुळं नॅशनल बॉक्सर बनला चक्क दरोडेखोर! शस्त्रास्त्र साठ्यासह 6 जणांना अटक

उत्तर प्रदेशातील नॅशनल बॉक्सर आशु याने त्याच्या साथिदारांसोबत एका कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून केली 30 लाखांची चोरी.पोलिसांना माहिती मिळताच अत्यंत कमी वेळेत केली चोरांना आटक.

Updated: Dec 20, 2023, 07:55 PM IST
गरीबीमुळं नॅशनल बॉक्सर बनला चक्क दरोडेखोर! शस्त्रास्त्र साठ्यासह 6 जणांना अटक title=
national level boxer robbery 30 lakh rs arrested crime news

कमी वेळात लाखो रुपये कमवण्यासाठी चुकीचा मार्ग अवलंबून खेळाडूच चोर बनला आहे. नॅशनल लेव्हलला बॉक्सिंग स्पर्धेत खेळलेल्या खेळाडूने चोरी केल्याची घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. एका कंपनी मधील कर्मचाऱ्यांकडून 30 लाख रुपयांची लूट केल्याची घटना उघडकीस आली. चोराने ही चोरी त्याच्या साथिदारांसोबत केली असून, बुलंदशहर पोलिसांनी चोरांना अटक केली आहे. लुट करणारे सर्व चोर हरियाणा येथे राहणारे आहेत. अशी माहिती उत्तर प्रदेशातील बुलंदशहर पोलिसांनी  दिली.

एसएसपी श्र्लोक कुमार यांनी दिलेल्या माहिती नुसार,12 डीसेंबर रोजी एका कंपनीचे कर्मचारी अरनिया प्लांटमध्ये कारने पैसे घेऊन येणार असल्याची माहिती चोरांना मिळाली होती.कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडे असलेली रक्कम लूटण्यासाठी चोरांनी नियोजन केले होते.12 डीसेंबर रोजी कंपनीचे कर्मचारी कारने पैसे घेऊन निघाले असता कार पहासू पोलिस स्टेशन परिसरात पोहचली होती. चोरांनी कार ओव्हर टेक करत कर्मचाऱ्यांची कार थांबवून कर्मचाऱ्यांकडून 30 लाख रूपयांची चोरी करून फरार झाले. पोलिसांना ही माहिती मिळताच त्यांनी चोरांना पकडून अटक केली. चोरी करणारे एकुण सहा चोर होते. हे सर्व चोर हरियाणा येथे राहणारे आहे.

कर्मचारांचा ड्रायवर प्रदिप चोरांच्या संपर्कात होता.प्रदिपमुळे पोलिसांना पूरावे मिळाले आहेत. अटक केलेल्या चोरांमध्ये एक चोर आशु नॅशनल आणि कृणाल स्टेट लेवलचे बॉक्सिंग स्पर्धेत खेळलेले आहेत. यांमधील एक चोर दिल्ली पोलिसमध्ये ड्रायवर होता. पोलिसांनी चोरांकडून 28.12 लाख रुपये, 6 बंदूके आणि एक आर्टीगा कार ताब्यात घेतली आहे. एसएसपी श्र्लोक कुमार यांनी चोरांनी अत्यंत कमी वेळेत पोलिसांनी अटक केल्याने एसएसपी श्र्लोक कुमार यांनी पोलिसांचं कैतुक करत अटक करणाऱ्या पोलिसांच्या टीमला 25,000 रुपये बक्षीस देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.